उकडीच्या पाच लाख मोदकांची आॅर्डर, गुरूवार रात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:47 AM2017-08-23T03:47:34+5:302017-08-23T03:48:05+5:30

बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे.

Order of 5 lakhs of coconut seed, daily demand till Thursday night from Anant Chaturdashi | उकडीच्या पाच लाख मोदकांची आॅर्डर, गुरूवार रात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मागणी

उकडीच्या पाच लाख मोदकांची आॅर्डर, गुरूवार रात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मागणी

googlenewsNext

ठाणे : बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे. गणशोत्सवात दहा दिवसात चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण ठाण्यात तब्बल पाच लाख उकडीच्या मोदकांची खरेदी होईल, असे उपहारगृहे, घरगुती वस्तुंचे पुरवठादार आणि बचत गटातील महिलांनी सांगितले.
मोदकाचा आकार, दर्जा यानुसार त्याची किंमत ठरते. दरवर्षी वाढणारी महागाई, कराच्या रचनेतील बदल आणि मजुरी यामुळे यंदा मोठ्या आकाराच्या एका मोदकाची किंमत २५ रुपयांवर गेली आहे.
श्री गणरायाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. यात नैवेद्य म्हणून उकडीच्या मोदकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपतीच्या नैवेद्यात ओला नारळ-गुळाच्या सारणाने गच्च भरलेला शुभ्र, गुबगुबीत मोदक, त्यावर तुपाची धार हा बेत हमखास असतो. आदल्या दिवसापासूनच मोदक बनविण्याची तयारी सुरू होते. ज्यांना घरी मोदक करणे शक्य नसते ते आॅर्डर देऊन तयार मोदक खरेदी करतात. उपहारगृहांपासून घरगुती आॅर्डर्स घेणारे, बचत गटांचे स्टॉल येथे त्याचे बुकिंग सुरू असते.
आठवडाभरापासून मागण्या नोंदवून घेतल्या जात होत्या. अजूनही काही ठिकाणी त्या गेतल्या जात आहेत. पण अनेक दुकानांनी अंदाज घेत आता आॅर्डर्स घेणे थांबवलेही आहे. कोणी हजार मोदकांच्या आॅर्डर्स घेतल्या आहेत, तर कोणी पाच हजार मोदकांच्या.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी बहुतांश ठिकाणी मोदक उपलब्ध होतील. गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी मोठ्या प्रमाणात मोदकांची खरेदी होणार असल्याचे उपहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले; तर या दिवसापासून पुढे अनेत चतुर्दशीपर्यंत भक्तांसाठी मोदक उपलब्ध असतील, असे केदार जोशी म्हणाले. वाढत्या महागाईमुळे उकडीच्या मोदकांचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षी एक मोदक २२ रुपये दराने मिळत होता. परंतु यंदा त्याचे दर २५ रुपयांवर गेले आहेत. काही उपहारगृहांनी मात्र दर जैसे थे ठेवले आहे.

महाराष्ट्रीयन
थाळीतही समावेश
ज्या ठिकाणी महाराष्ट्रीयन थाळी मिळते, घरगुती जेवण मिळते त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात जेवणात उकडीचे मोदक हमखास उपलब्ध करून दिले जातात. नेहमीच्या आॅर्डर पलिकडे हे मोदक असतात. त्यातही खास करून केळीच्या पानावर जेवण वाढण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते.

तळलेले मोदकही उपलब्ध
उकडीच्या मोदकाप्रमाणे तळलेले मोदक आणि ओल्या- सुक्या नारळाच्या करंज्याही उपलब्ध आहेत. ४४० रुपये किलो असे त्यांचे दर आहेत.
अनेकदा बाहेरगावी नेण्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्यांना पसंती दिली जाते, असे पुराणिक म्हणाले. मोदक खरेदीचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

उकडीच्या मोदकांच्या आॅर्डर्स अवघ्या दोन दिवसांत फुल्ल झाल्या. पाच हजारांच्या मोदकांच्या आॅर्डर्स आमच्याकडे आहेत. पहिल्या दिवशीच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोदक खरेदी केले जाणार आहेत. गौरीपर्यंत मोदकांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे. - संजय पुराणिक

पारंपरिक मोदकच गणेशोत्सवासाठी तयार केले जातात. यंदा आम्ही मोदकांचे दर वाढविलेले नाहीत. आमच्याकडचे दर २० रुपये प्रती नग असेच ठेवलेले आहेत. आमच्याकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी एक हजार मोदकांची आॅर्डर आहे. त्यानंतरच्याही आहेत. हे मोदक पुढेही उपलब्ध केले जातील. - केदार जोशी

Web Title: Order of 5 lakhs of coconut seed, daily demand till Thursday night from Anant Chaturdashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.