नौपाड्यात होणार पार्किंग प्लाझा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:06 AM2017-11-15T02:06:22+5:302017-11-15T02:08:39+5:30

स्टेशन आणि नौपाडा परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत.

In the nupada, the parking plaza will be given place in the ward committee office | नौपाड्यात होणार पार्किंग प्लाझा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा देणार

नौपाड्यात होणार पार्किंग प्लाझा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा देणार

googlenewsNext

ठाणे : स्टेशन आणि नौपाडा परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता ठाणे महापालिकेने नौपाडा प्रभाग समिती कार्यालय इतरत्र पर्यायी ठिकाणी हलवून शाहु मार्केटची शाहू मार्केटची इमारत जमिनदोस्त करून त्याजागी सार्वजनिक पार्किंग प्लाझा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी तब्बल २०० कारसह असंख्य दुचाकींच्या पार्किंगची सोय होणार आहे. तसेच येथील गाळेधारकांचे तळ मजल्यावर पुनर्वसन करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
शाहू मार्केटची इमारत १९८० च्या दरम्यान बांधली असून ती सध्या जीर्ण झाली आहे. या इमारतीत नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, पुनर्वसन केलेले काही गाळेधारक (पोळी भाजी विक्रेते) व ग्राहक पंचायतीचे गोडावून आहे. या इमारतीची पुढील बाजू उंचावर तर मागील बाजू खाली गेलेली आहे. त्यामुळे मागील बाजू तोडण्यात येणार असून तळ मजल्यावर येथील गाळेधाराकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक पार्किंग उभारल्यास त्यापासून ५०० मी. त्रिज्येच्या परिसरात हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, एम.जी. रोड, तिनहातनाका, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण कॉलनी आदी परिसर येतो. तसेच एक किमीच्या त्रिज्येत ठाणे स्टेशन परिसर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारल्यास त्याचा जुन्या ठाण्यातील बहुतांश भागांना लाभ होऊन स्टेशन परिसरातील रस्ते पार्किंग मुक्त होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वासही पालिकेला वाटत आहे. या ठिकाणाहून स्टेशनकडे जाण्यासाठी टीएमटीच्या मिनी बस ठेवल्यास स्टेशन परिसरातील पार्किंगही कमी होण्यास मदत होणार आहे.
शाहू मार्केट इमारतीमधील प्रभाग समिती कार्यालय विष्णु नगरभागातील शाळा क्रमांक १९ चे इमारतीमध्ये हलविण्याचा पालिकेचा विचार आहे. ही इमारत सध्या बहुसंख्य प्रमाणात रिकामी आहे. तळ अधिक चार मजल्यांची ती असून तिला दोन जिने आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावर हॉल व कार्यालय असून, प्रत्येक मजल्यावर ८ वर्ग केले आहेत. यापैकी तळ मजला अधिक पहिला मजला प्रभाग कार्यालयास ठेवल्यास ८०० चौरस मीटर क्षेत्र प्रभाग कार्यालयाला उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास शिल्लक ५०० चौरस मीटर क्षेत्रातही बांधकाम करता येऊ शकणार आहे.
दरम्यान, शाहू मार्केटमध्ये सार्वजनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथे बेसमेंटमध्ये दुचाकींची व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: In the nupada, the parking plaza will be given place in the ward committee office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.