१५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:20 AM2019-06-15T00:20:28+5:302019-06-15T00:20:45+5:30

मीरा-भाईंदरमध्ये सर्वेक्षण : विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, जुन्या इमारती, गाळ््यात वर्ग

Notice to 150 private lessons | १५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा

१५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा

Next

मीरा रोड : मीरा भार्इंदरमधील खाजगी शिकवण्यांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ मे रोजी दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील खाजगी शिकवण्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गुरुवारपर्यंत १५० खाजगी शिकवणे वर्ग आढळले. त्यांना सुरक्षिततेच्या उपायोजनांबाबत नोटिसा बजावण्यास शुक्रवारपासून अग्निशमन दलाने सुरूवात केली आहे. तर आणखी शिकवण्यांचा शोध घेणेही सुरू आहे.

सूरत येथील खाजगी शिकवणीमध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मीरा भार्इंदरमधील खाजगी शिकवण्यांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षाही वाºयावर असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते.खाजगी शिकवणी चालकांच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३५० लहान - मोठया शिकवण्या चालतात. गलेलठ्ठ फी वसूल करणाºया चालकांनी शिकवण्या मात्र जुन्या इमारती, गाळे, सदनिकांमध्ये घेतात. बहुतांश शिकवण्या दाटीवाटीच्या जागेत असून विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था देखील खुराड्यासारखी आहे. बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग व तेही अडचणीचे व अरूंद आहेत. हवा व उजेड येण्यास जागा सोडली जात नाही. त्यातच अग्निशमन यंत्रणा चालकांकडून लावली जात नाही. पालिकेने खाजगी शिकवण्यांचे सर्वेक्षण सुरु केले असून विद्यार्थी संख्येनुसार शिकवण्यांची वर्गवारी केली आहे. गुरुवारी १३ जूनपर्यंत १५० खाजगी शिकवण्या आढळल्या. त्यातील १२४ शिकवण्यांची वर्गवारी केली असून २० ते २५ विद्यार्थी संख्या असलेल्या २०, २६ ते ५० विद्यार्थी संख्या असलेल्या ३२, ५१ ते ७५ विद्यार्थी संख्या असलेल्या १८, ७६ ते १०० विद्यार्थी असलेल्या ५ व शंभर पेक्षा जास्त संख्या असलेल्या शिकवण्यांची संख्या ४८ इतकी आहे. अजूनही सर्वेक्षण सुरु असून शिकवण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आढळलेल्या १५० शिकवणी चालकांना नोटिसा देण्यास सुरूवात केली आहे. शाळांच्या निकषानुसारच शिकवणी चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपायोजना करण्यास सांगितल्या जाणार आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षण उपाययोजना अधिनियम २००६ मधील कलम ६ व नियम ९(१) नुसार कार्यवाही करणार असल्याचे प्रभारी अग्निशमन दलप्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले.
शिकवणीच्या जागेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची आसनक्षमता निश्चित केली जाणार आहे. पोटमाळ्यांमधील शिकवण्या बंद करायला सांगणार आहोत. अग्निशमन यंत्रणा बसवणे सक्तीचे करू, पुरेशा खिडक्या, अतिरिक्त दरवाजा याची खात्री केली जाईल. धोकादायक अवस्थेतील वा बांधकामातील शिकवण्या बंद करण्यास सांगणार आहोत. विद्यार्थ्यांना आपत्कालीन स्थितीत घेण्याची खबरादारी या बद्दल अग्निशमन दलातर्फे प्रशिक्षण देणार आहोत असे बोराडे म्हणाले.

१२ शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही

मीरा भार्इंदरमधील ७६ शाळांना अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पत्रव्यव्हार, नोटिसा बजावल्या आहेत. यातील ६४ शाळांनी अग्निशमन यंत्रणा बसवली आहे. पण १२ शाळांनी अजूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षे कडे कानाडोळा चालवला आहे. शिक्षण विभागाकडूनही या शाळांना अनुदान बंद करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या बाबत शिक्षण संचालकांसह आयुक्त आदींची बैठक घेऊन कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जणार आहे.
 

Web Title: Notice to 150 private lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.