वृक्षवल्ली प्रदर्शनाला एक लाखाहून अधिक नागरीकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 02:15 PM2019-01-14T14:15:59+5:302019-01-14T14:19:19+5:30

वृक्ष वल्ली प्रर्दशनास यंदा तब्बल १ लाखाहून अधिक ठाणेकर नागरीकांनी हजेरी लावून प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना समारोपाच्या दिवशी सन्मानीत करण्यात आले.

More than one lakh citizens attend the tree display | वृक्षवल्ली प्रदर्शनाला एक लाखाहून अधिक नागरीकांची हजेरी

वृक्षवल्ली प्रदर्शनाला एक लाखाहून अधिक नागरीकांची हजेरी

Next
ठळक मुद्देस्पर्धेत ४० स्टॉलधारकांचा सहभागरविवारी झाली सांगता

ठाणे -ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या वृक्षवल्ली-२०१९ या प्रदर्शनातील झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देवून रविवारी गौरविण्यात आले. ठाण्याच्या रेमंड कंपनी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला यंदा १ लाखाहून अधिक लोकांना भेट दिली.
                यावेळी उप महापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, कल्पना पाटील, संध्या मोरे, पल्लवी कदम, उद्यान विभागाचे उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रकाश बर्डे, विक्रांत तावडे, नम्रता भोसले, अभिनेता संतोष जुवेकर आदी उपस्थित होते.
वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने ११ ते १३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षवल्ली-२०१९ प्रदर्शनाचा रविवारी सांगता समारंभ झाला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण ४० स्टॉल्सधारकांसह १०० वैयक्तीक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम क्र मांक सेंट्रल रेल्वे, द्वितीय हिरानंदानी, तृतीय क्र मांक गोदरेज कंपनी तर चतुर्थ क्र मांक लोढा ग्रुप यांच्यासह वैयक्तीक पारितोषिक मिळवलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.


 

Web Title: More than one lakh citizens attend the tree display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.