भास्कर जाधव म्हणजे दुसरे संजय राऊत, सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी  काहीतरी बडबडणारे ; अविनाश जाधव

By अजित मांडके | Published: April 16, 2024 05:13 PM2024-04-16T17:13:06+5:302024-04-16T17:14:28+5:30

आमदार भास्कर जाधव हे दुसरे संजय राऊत आहेत असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी लगावला आहे.

mns leader avinash jadhav controversial statement on bhaskar jadhav tells he is another sanjay raut | भास्कर जाधव म्हणजे दुसरे संजय राऊत, सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी  काहीतरी बडबडणारे ; अविनाश जाधव

भास्कर जाधव म्हणजे दुसरे संजय राऊत, सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी  काहीतरी बडबडणारे ; अविनाश जाधव

अजित मांडके , ठाणे : सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी काही तरी बडबडत राहणारे आमदार भास्कर जाधव हे दुसरे संजय राऊत आहेत असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. तसेच लोकसभेसाठी उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीतील एकही उमेदवार निवडून येण्याच्या लायकीचा नाही असेही ते म्हणाले. येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे ही यावेळी त्यांनी भाकीत वर्तवले आहे.

भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना टोमणे मारत असतील. मध्यंतरी त्यांनी स्टेटस ठेवले होते. स्वतःच्या मुलाला तिकीट मिळावी,यासाठी ते इतर राजकीय पक्षांच्या वाऱ्या करत होते अशी टीकाही त्यांनी केली. तसेच येत्या रत्नागिरीच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा महाराष्ट्र सैनिक दाखवतील. याशिवाय येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

राज ठाकरे हे परंपरेनुसार बाळासाहेबांची युती असणाऱ्या भाजपसोबत गेले आहेत, त्यामुळे भास्कर जाधवांना का मिरची लागते. असा सवालहि त्यांनी केला. याशिवाय उध्दव ठाकरे यांच्यासारखा माणूस काँग्रेस सोबत गेला त्यांच्यासोबत लाचट भास्कर जाधव सारखी माणस गेल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच भास्कर जाधव यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या निवडणुकीत कळेल राज ठाकरे गेल्यानंतर काय होत. राज ठाकरे त्यांचा नीट समाचार घेतील असेही ते म्हणाले. मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना हि टीका केली.

Web Title: mns leader avinash jadhav controversial statement on bhaskar jadhav tells he is another sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.