मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना शाळा होणार डिजिटल, बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:04 AM2017-09-27T04:04:38+5:302017-09-27T04:04:48+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे.

Mira-Bhairinder Municipal Corporation's Channa School will benefit from digital, most tribal students will get the benefit | मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना शाळा होणार डिजिटल, बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना होणार लाभ

मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना शाळा होणार डिजिटल, बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना होणार लाभ

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे.
पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळा आहेत. या शाळांचा शैक्षणिक दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत सुमार असल्याचा आरोप सर्वच स्तरातुन केला जातो. त्यामुळे पालिकेने खाजगी शाळांतील दर्जेदार शिक्षण गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मिळावे, यासाठी या शाळांना व्यावसायिक ऐवजी ५० टक्के निवासी कर आकारण्यास सुरुवात केली. त्यातून २५ टक्के जागा त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. परिणामी, त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेखेरीज पर्याय नसल्याने नववीनंतरचे शिक्षणही बेभरवशी राहते. कारण पालिकेच्या शाळा आठवीपर्यंतच आहेत.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह गणवेशाचे मोफत वाटप करते. परंतु, शिक्षणाचा दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत वाढत नसल्याने सध्या डिजिटल होत असलेल्या खाजगी शाळांप्रमाणेच पालिका शाळासुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न एक वर्षापूर्वी सुरु झाला. त्याला नुकतेच यश आल्याने डिजिटल शाळेसाठी सुरुवातीला चेना मराठी शाळेची निवड करण्यात आली आहे. ही शाळा शहराच्या वेशीवर तसेच संजय गांधी राष्टÑीय उद्यानाला लागून असल्याने या शाळेत बहुतांशी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते आठवीपर्यंत २४१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी एक बोर्ड देण्यात येणार आहे.
भूगोल, इतिहास, विज्ञान, सांस्कृतिकतेचे सचित्र ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत २१ संगणक बसविण्यात येणार असून सुसज्ज लायब्ररी असेल.

डिजिटल शिक्षणाला चेना मराठी शाळेपासुन सुरुवात होणार असली, तरी पालिकेच्या उरलेल्या शाळांतही ते लवकरच सुरु केले जाणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.
- दीपक पुजारी, उपायुक्त पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख.

डिजिटल शिक्षणासाठी चेना मराठी शाळेची निवड झाल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.
- विश्वास हिरे, चेना शाळेचे मुख्याध्यापक

Web Title: Mira-Bhairinder Municipal Corporation's Channa School will benefit from digital, most tribal students will get the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.