लकी कम्पाउंडच्या साक्षीदारास आरोपींच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:29 AM2018-04-04T05:29:27+5:302018-04-04T05:29:27+5:30

तब्बल ७४ नागरिकांचा बळी घेणाऱ्या लकी कम्पाउंड दुर्घटनेतील साक्षीदारास आरोपींनी धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

 Lucky Compound witness threatens accused | लकी कम्पाउंडच्या साक्षीदारास आरोपींच्या धमक्या

लकी कम्पाउंडच्या साक्षीदारास आरोपींच्या धमक्या

googlenewsNext

ठाणे - तब्बल ७४ नागरिकांचा बळी घेणाऱ्या लकी कम्पाउंड दुर्घटनेतील साक्षीदारास आरोपींनी धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. तब्बल ७४ जणांचा बळी घेणाºया या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. या खटल्यामध्ये गत महिन्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राजकुमार फतेहसिंग यादव यांची साक्ष झाली होती. त्यांनी साक्ष नोंदवल्यानंतर, १७ मार्च रोजी या प्रकरणातील दोन आरोपी आणि एका आरोपीच्या भावाने यादव यांना दमदाटी केली. यादव यांनी याबाबत शीळ- डायघर पोलिसांत तक्रारदेखील नोंदविली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी हा गंभीर प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची दखल घेत न्यायालयाने बुधवारी पुढील सुनावणी ठेवली आहे.

Web Title:  Lucky Compound witness threatens accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.