कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:49 AM2017-10-16T06:49:00+5:302017-10-16T06:49:16+5:30

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.

 Local tax increase for loans | कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

कर्जत : मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.
१ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने १६ लोकल फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दादर-बदलापूरसाठी दोन, दादर-टिटवाळ्यासाठी दोन, दादर-डोंबिवलीसाठी सहा आणि कुर्ला -कल्याणकरिता सहा या फेºयांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कर्जतसाठी एकही फेरी नसल्याने कर्जतकर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कर्जत-कल्याण किंवा ठाणे लोकल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली असता रेल्वे प्रशसनाने जोपर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान पाचवी व सहावी लाइन्सचे काम होत नाही, तसेच जोपर्यंत कल्याण येथे अतिरिक्त फलाट होत नाही आणि अतिरिक्त लोकल गाड्या उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत तरी कर्जत-कल्याण किंवा ठाणेपर्यंत लोकल गाड्या सुरू करणे रेल्वे प्रशासनास शक्य होणार नाही, असे लेखी उत्तर रेल्वे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना दिले आहे.
ओसवाल यांनी रेल्वे प्रशासन, कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा असणे किती गरजेचे आहे हे सविस्तरपणे मांडले आहे. काही वर्षांपूर्वी कर्जतकर प्रवासी बदलापूर,अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला सहज उतरू शकत होता. साधारण दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना कल्याण किंवा ठाण्यापर्यंत कधीही जाणे सहज शक्य होते, कारण पूर्वी लोकल गाड्यांना एवढी गर्दी होत नव्हती. परंतु आजच्या घडीला सकाळी गाडीने अंबरनाथ, कल्याण किंवा ठाण्याला जाणे अशक्य होऊन बसले आहे. कारण कर्जत लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असल्यामुळे, या लोकल गाड्यांमध्ये बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे आदी स्थानकांवर चढणाºया प्रवाशांची एवढी गर्दी असते की कर्जतचा प्रवासी उतरूच शकत नाही. नोकरीनिमित्त रोज जाणाºया प्रवाशांना कल्याण किंवा ठाण्याला उतरताना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच उतरावे लागते. त्याचप्रमाणे महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा इच्छित स्थळी उतरताना कसरत करावी लागते. काही वेळा विद्यार्थ्यांना पुढच्या स्थानकावर उतरावे लागते. ज्येष्ठ नागरिक किंवा महिला व लहान मुलांना या वेळेस प्रवास करणे शक्यच होत नाही. याबाबतीत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा सुरू करून कर्जतकरांना होणाºया त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे. मात्र, नवीन वेळापत्रकात कर्जतसाठी एकही लोकल गाडी न दिल्याने कर्जतकर रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत.

आज कर्जतकरांना सकाळच्या वेळेला बदलापूर, अंबरनाथ, कल्याणला उतरणे अवघड झाले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वरील बाबतीत स्वत: लक्ष घालून कर्जत-कल्याण दरम्यान चालवण्यासाठी लोकल गाड्या उपलब्ध करून द्याव्यात किंवा लवकरात लवकर कर्जत-कल्याण अशी शटल सेवा सुरू करावी, अशी तमाम कर्जतकरांची मागणी आहे.
- पंकज ओसवाल,
प्रवासी संघ,कर्जत

Web Title:  Local tax increase for loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.