सात वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सर्तकतेमुळे फसला, अपहरणकर्त्याला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 09:37 PM2017-09-11T21:37:27+5:302017-09-11T21:37:36+5:30

शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात सात वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत असताना वडिलांच्या नजरचुकीने एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला.

The kidnapping of a seven-year-old girl has been unsuccessful due to the prevalence of citizenship, to the abductor | सात वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सर्तकतेमुळे फसला, अपहरणकर्त्याला दिला चोप

सात वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सर्तकतेमुळे फसला, अपहरणकर्त्याला दिला चोप

Next

कल्याण, दि. 11 - शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात सात वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत असताना वडिलांच्या नजरचुकीने एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला. नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक केली आहे. अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    राधानगरी सोसायटीत राहणारे सतीश पोखरकर हे नोकरी करतात. ते रात्री साडे नऊ वाजता हातगाडीवर सॅण्डविच खाण्यासाठी साई चौकात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची सात वर्षाची मुलगी हिला सोबत नेले होते. ते सॅण्डवीच खात असताना एका तरुणाने त्यांच्या नजरचुकीने मुलीला उचलून घेतले. तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नागरिकांच्या लक्षात आला. नागरीकांनी त्याला पकडून त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका करीत त्याला चांगलाच चोप दिला. अपहरण करणा:या तरुणाचे नाव नवरंगलाल सुजनकुमार कूमावत असे आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अंमली पदार्थाचे भरपूर सेवन केले असल्याने त्याची नशा आज सकाळ पर्यंत उतरलेली नाही. त्यामुळे त्याची पुढील चौकशी पोलिसांना करता आलेली नाही. त्याची नशा उतरल्यावरच त्याची पुढील चौकशी केली जाईल. कल्याण स्टेशन व ओसाड परिसरात गदरुल्ले फिरत असतात. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही. चरस, गांजा, गर्द आणि मेडिकलमधून मिळणारी नशेची औषधे घेऊन टोळकी फिरतात. त्यांच्या विरोधात पोलिसांची कारवाई होत नसल्याने या नशाबाजांकडून मुले पळवून ती भिकेला लावणारी टोळी शहरात सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
नवी मुंबईतील लहानगा रघू शिंदे या मुलाला पळवून नेणारा तरुण सीसीटीव्ही कैद झाला होता. तो देखील नशा करुनच होता. रघू शिंदे हा मुलगा परत त्यांच्या पालकाना मिळाला आहे. त्याचप्रमाणे पोखरकर यांची मुलीचे अपहरण होण्यापासून वाचले आहे. अपहरणाचा प्रयत्न झाल्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे.

Web Title: The kidnapping of a seven-year-old girl has been unsuccessful due to the prevalence of citizenship, to the abductor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा