केडीएमसी आवारात भंगाराचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:55 AM2018-09-19T03:55:15+5:302018-09-19T03:55:29+5:30

फोटो व्हायरल होताच स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांची धावपळ

KDMC premises stack of scrap | केडीएमसी आवारात भंगाराचे ढीग

केडीएमसी आवारात भंगाराचे ढीग

Next

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयात फेरीवाल्यांकडून जप्त केलेल्या हातगाड्या, होर्डिंग्ज, टाकाऊ लोखंडी सामान खितपत पडले आहे. यामुळे या कार्यालयाच्या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. त्याबाबतचे फोटो मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल होताच आयुक्त गोविंद बोडके यांनी स्वच्छतेचे आदेश दिले. त्यामुळे या आवाराची स्वच्छता करण्यासाठी अधिकाºयांची धावपळ उडाली.
डोंबिवली विभागीय कार्यालयात ‘फ’ आणि ‘ग’ अशी दोन प्रभाग कार्यालये आहेत. त्यामुळे तेथे कामासाठी येणाºया नागरिकांची संख्या मोठी आहे. वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसागणिक बिकट होत आहे. या कार्यालयाच्या आवाराला लागूनच महापालिकेची शाळाही आहे. मात्र, पटसंख्येअभावी आठ ते दहा वर्षांपासून ती बंद आहे. परिणामी भिंतींची पडझड झाली आहे. छपरावरील कौले तुटली आहेत. तसेच अनेक वर्षे बंद असलेल्या वर्गामध्ये झाडेही उगवली आहेत. त्यामुळे या शाळेला खंडाराचे स्वरूप आले आहे. हा भाग मोकळा करून महापालिकेचा आवार मोठा करण्याकडे दुर्लक्ष झाले असताना तेथे भंगार आणि कचरा आहे. या अडगळीच्या सामानांमुळे पावसाचे पाणी साचून आवारात तळे निर्माण होत आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने कचरा साचून डासांचे प्रमाणही वाढले आहे. एकूणच या अस्वच्छतेचे फोटो दक्ष नागरिकांनी आयुक्त बोडके यांना पाठवले. तत्काळ त्यांनी त्याची दखल घेत अधिकाºयांना स्वच्छतेचे आदेश दिले. त्यामुळे अधिकाºयांना खडबडून जाग आली. तत्काळ त्यांनी साफसफाईला सुरुवात केली. दरम्यान, स्वत:च्या आवारात स्वच्छता राखण्याकडे अधिकाºयांचा होत असलेला कानाडोळा पाहता शहर स्वच्छतेची त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, अशी चर्चा होत आहे.

इतरत्रही स्वच्छतेचे तीनतेरा
शहरात काही भागांमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ‘कॉल आॅन डेब्रिज’ सुविधेचा पुरता बोºया वाजल्याने ठिकठिकाणी डेब्रिजचे ढीग आहेत. पेंढरकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस, नांदिवली नाल्यालगत, रेल्वेच्या हद्दीतील बावन्न चाळीत सर्रास हे चित्र पाहायला मिळते.
कचरा वेळीच उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी रहिवासी तो जाळतात. घरडा सर्कल ते टाटा पॉवर या न्यू कल्याण रोडवर सोमवारी सायंकाळी हे वास्तव दिसून आले. त्यात गॅरेजवालेही मागे नाहीत.
आधारवाडी डम्पिंगच्या ठिकाणी रस्ता बनविल्याने कचरा टाकण्याची प्रक्रिया आता वेगाने होत आहे. परंतु, कचरा वेळेवर न उचलणे, डेब्रिजच्या कचºयाकडे दुर्लक्ष करणे असले प्रकार सर्रास सुरू आहेत. डम्पिंगची वाट सुकर करणाºया महापौर विनीता राणे यात गांभीर्याने लक्ष घालतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
२ आॅक्टोबर या महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता पंधरवडा घोषित केला आहे. हा पंधरवडा तरी केडीएमसी गांभीर्याने घेईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बॅटऱ्यांची सुरक्षाही धोक्यात
कार्यालयाच्या आवारात सोलरदिवे आहेत. पण त्याच्या बॅटºयांच्या सुरक्षकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. बॅटºयांच्या भोवतालची आवरणे गंजून त्यातून बॅटºया बाहेर आल्या आहेत. त्यांच्या देखभालीकडे कानाडोळा झाल्याने भविष्यात या बॅटºया चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: KDMC premises stack of scrap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.