कळवा रुग्णालय झाले हायटेक! ओपीडीपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:35 AM2018-04-06T06:35:59+5:302018-04-06T06:35:59+5:30

कळवा रुग्णालयाचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात ओपीडी सेवा संगणकाद्वारे दिली जाणार असल्याने यापुढे रुग्णांना रांगेत ताटकळत राहण्याची गरज भासणार नाही.

Kalwa Hospital became High Tech! Starting from OPD | कळवा रुग्णालय झाले हायटेक! ओपीडीपासून सुरुवात

कळवा रुग्णालय झाले हायटेक! ओपीडीपासून सुरुवात

Next

ठाणे - कळवा रुग्णालयाचा संपूर्ण कारभार संगणकीकृत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात ओपीडी सेवा संगणकाद्वारे दिली जाणार असल्याने यापुढे रुग्णांना रांगेत ताटकळत राहण्याची गरज भासणार नाही. याच आयकार्डाच्या आधारे रुग्णाला कोणता आजार आहे, त्यावर यापूर्वी कोणते उपचार झाले, आदींसह सर्वच माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हॉस्पिटलमधील इतर सर्व सेवा एकमेकांशी कनेक्ट करून त्यांचे रिपोर्टिंग डिजिटल असणार आहे.
रोज हजारो रुग्ण कळवा रुग्णालयात जिल्ह्याच्या विविध भागांतून उपचारासाठी येतात. यात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या घरात आहे तर, दाखल होणाºया अंतर्गत रुग्णांची संख्या ३०० च्या आसपास आहे. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रुग्णाला चार ते पाच तासांचा कालावधी लागतो. त्यातही डॉक्टर उपलब्ध होतील अथवा नाही, रांगेत उभे राहून शारीरिक त्रासात आणखी भर पडणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, आता पहिल्या टप्प्यात ओपीडी हायटेक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बँकेत ज्या पद्धतीने येणाºया ग्राहकाला टोकन नंबर दिला जातो, त्याच धर्तीवर रुग्णाला टोकन नंबर दिला जाणार आहे. त्याचा क्रमांक डिस्प्ले झाल्यानंतर त्याचा डॉक्टरांकडे नंबर लागणार आहे. कोणते उपचार केले, कोणती औषधे दिली, त्या रुग्णाचा इतिहास आदी सर्व माहिती संगणकात जमा होणार आहे. त्यामुळे डॉक्टर बदलला तरी, त्या रुग्णाची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे एकदा केसपेपर काढल्यानंतर पुन्हा वारंवार रुग्णाला केसपेपरही काढावा लागणार नाही.
महापालिका ही संकल्पना बिल्ट, आॅपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर (बुट) या संकल्पनेवर राबवणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील सेवेतील त्रुटी दूर करून पुढील दोन ते तीन महिन्यांत ही सेवा प्रत्यक्ष सुरू होईल. एकूण १३ विभाग या योजनेत संगणकाद्वारे जोडले जाणार आहेत.

विविध १३ विभाग परस्परांशी जोडणार...
केवळ ओपीडीच नव्हे तर रुग्णालयातील इतर विभागदेखील कनेक्ट केले जाणार आहेत. त्यानुसार, रुग्णाला त्याचे रिपोर्टदेखील वारंवार स्वत:जवळ बाळगण्याची गरज राहणार नसून ते डिजिटल यंत्रणेद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तसेच त्याला इतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा झाल्यास दुसºया डॉक्टरलादेखील याचे तात्पुरते हक्क देता येणार आहेत. याशिवाय रक्त लॅब, केसपेपर, मेडिकल आदींसह इतर सर्व विभागही याला कनेक्ट केले जाणार आहेत. मेडिकलमध्ये कोणती औषधे उपलब्ध आहेत. एखाद्या औषधाचा स्टॉक संपला आहे का, यासह इतर माहितीदेखील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. डिजिटल यंत्रणेद्वारे एक्सरे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या पैशांची यामुळे बचत होणार आहे.

मेडिकल कॉलेजही होणार कनेक्ट : एखाद्या विद्यार्थ्याने केव्हा अ‍ॅडमिशन घेतले, सध्या तो काय करतो आहे, कोणत्या वर्षाचा अभ्यासक्रम सुरू आहे, किती विद्यार्थी शिक्षण आहेत, आदींसह इतर माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. त्यातही या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना एखाद्या रुग्णावर उपचार करायचे असतील, त्याला त्याचे केसपेपरचे डिटेल उपचाराचे रिपोर्ट हेही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Kalwa Hospital became High Tech! Starting from OPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.