ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 03:39 PM2018-10-15T15:39:32+5:302018-10-15T15:41:18+5:30

१५ ऑक्टोबर रोजी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भर वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. 

Joshi Bedekar College of Thane Vidya Prasarak Mandal celebrates reading inspiration day | ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

googlenewsNext
ठळक मुद्दे जोशी बेडेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरालेखकांच्या साहित्याचे एक अनोखे प्रदर्शन नामांकित लेखकांच्या साहित्यकृती

ठाणे : १५ ऑक्टोबर रोजी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भारतीय इंग्रजी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लेखकांच्या साहित्याचे एक अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले होते. 

आर के नारायण, मुल्कराज आंनद, राजा राव, अनिता देसाई, अमिश त्रिपाठी, आनंद निलकांतन, आश्विन संघी, चेतन भगत, शोभा डे, सुधा मूर्ती इत्यादी नामांकित लेखकांच्या साहित्यकृती ठेवण्यात आल्या होत्या. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांच्या हस्ते या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे , ग्रंथपाल प्रा नारायण बारसे, सहायक ग्रंथपाल सौ पाटील,प्रा अनिल भाबड इत्यादी उपस्थित होते. विश्व साहित्यात भारतीय लेखकांनी आपल्या लेखनाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातील भारतीय इंग्रजी साहित्याला बुकर पारितोषिक मिळाले आहे. यातील अनेक साहित्य कृतीचे वाचन यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी करावे तसेच वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी या हेतूने हे अनोखे प्रदर्शन भरवले गेले. कला व वाणिज्य विभागातील अनेक विद्यार्थी व प्राध्यापकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा प्रशांत धर्माधिकारी यांचे "वाचन संस्कृती आणि आपण" याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. "दिसामाजी काही तरी ते लिहावे । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" हा समर्थ रामदास स्वामी यांचा विचार मांडत , विद्यार्थ्यांना वाचन कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक नवनवीन प्रयोगांवर प्रा प्रशांत धर्माधिकारी यांनी प्रकाश टाकला.  ज्येष्ठ लेखक व निबंधकार सर फ्रान्सिस बेकन याच्या रिडींग मॅकेथ अ फुल मॅन; काँफ्रेरेन्स अ रेडी मॅन अँड रायटिंग अँन एक्झॅट मॅन हे  वचन उद्धृत करत वाचनाने व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भर पडते असेही प्रा धर्माधिकारी म्हणाले.  यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांचे आवडते लेखक व त्यांचे वाचन याविषयी आपले विचार मांडले, तसेच पु ल देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" या पुस्तकातील  काही निवडक उताऱ्यांचे वाचन  दिशा सरमाळकर,गार्गी बोरगावकर व फरीयल सयद या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमास अनेक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Joshi Bedekar College of Thane Vidya Prasarak Mandal celebrates reading inspiration day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.