पडघामध्ये गोदाम विकासाच्या वादातून केलेल्या गोळीबारात पाचजण अटक, चौदाजण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:51 AM2018-11-10T00:51:18+5:302018-11-10T00:54:03+5:30

भिवंडी : तालुक्यात खारपट्ट्यातील जमीन मालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीन शिल्लक राहिली नाही.त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील ...

Five fugitives, fourteen absconding, fired by warehouse development disputes | पडघामध्ये गोदाम विकासाच्या वादातून केलेल्या गोळीबारात पाचजण अटक, चौदाजण फरार

पडघामध्ये गोदाम विकासाच्या वादातून केलेल्या गोळीबारात पाचजण अटक, चौदाजण फरार

Next
ठळक मुद्देराजकीय व आर्थिक वर्चस्वासाठी हल्लापाच आरोपींना अटक तर चौदा आरोपी फरारगोदामाच्या विकासकामांतून पेटला वाद

भिवंडी: तालुक्यात खारपट्ट्यातील जमीन मालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीन शिल्लक राहिली नाही.त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध गावात गोदामे बांधण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा विकास सुरू असताना आपले राजकीय व आर्थिक वर्चस्व निर्माण करण्याकरीता काही पुढाऱ्यांमध्ये अहमीका लागली असुन त्यामधून मागील महिन्यात भाजपाच्या पदाधिका-यावर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने परिसरांत खळबळ माजली होती. या घटनेने परिसरांत गँगवार सुरू होईल की काय? अशी भिती सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलीसांनी गोळीबाराच्या घटनेतून आरोपींचा छडा लावून चार जणांना अटक केली आहे.तर १४ जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
मागील महिन्यात २० आॅक्टोंबर रोजी पडघा लगतच्या आन्हे गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश उर्फ विजू गायकर यांच्यावर विरोधकांनी रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा हल्ला २००कोटीचा व्यवहार असलेल्या गोदाम विकासाच्या वादातून झाल्याचे तपासाअंती समोर आले. या घटनेच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी पुढे जाण्यास रस्ता न सापडल्याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळाले होते. त्यामुळे पोलीसांना हत्येचा कट रचणा-यांचा सुगावा लागण्यास मदत झाली. या घटनेतील मुख्य सुत्रधार व त्याचे तिघे साथीदार सुपारीबाज गुंड असुन ते सातारा व पूणे भागातील कुप्रसिद्द गँगस्टर आहेत. सोमनाथ चव्हाण(सोमाभाई), गौतम काशिनाथ शिंदे व हर्षद सुरेश येमकर (पूणे) अशी तिघांची नांवे असुन त्यापैकी गौतम व हर्षद या दोघांना या पुर्वीच पोलीसांनी अटक केली आहे.तर सोमनाथ चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान हल्लेखोर व शार्प शूटर्स फरार झाले होते तर कट रचणारे विरोधक देवदर्शनासह पर्यटनासाठी पंजाब,जम्मू काश्मीर येथे निघून गेल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून गुरूवार रोजी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन घोडविंदे, शूटर्स महेश उर्फ महाराज मधुकर चांदिलकर व विनायक सुरेश चव्हाण या तिघांना अटक केली. त्यांना शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर.ए. सावंत यांनी १३नोव्हेंबरपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या कटातील १४ जण फरार असुन पडघ्यातील दोन राजकीय पुढाºयांचा देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पडघा पोलीसांना येथील गँगवारवर अंकूश ठेवण्यासाठी नव्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत.

Web Title: Five fugitives, fourteen absconding, fired by warehouse development disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.