समाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे : धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:57 PM2018-08-13T15:57:47+5:302018-08-13T16:00:11+5:30

धनगर प्रतिष्ठानतर्फे ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

Education is important for community development: Dhangar community leader Jai Singh Tatya Shendge | समाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे : धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे  

समाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे : धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे  

Next
ठळक मुद्देधनगर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवसमाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे :  जयसिंग शेंडगे  

ठाणे : समाजाचा खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास करायचा असेल तर शिक्षण हे महत्वाचे आहे यासाठी सर्व  विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे यांनी ठाणे येथे केले. 

    धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे शेंडगे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी ठाणे जिल्हयातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे व नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात जन्मताच दोन्ही हात नसतानाही खडतर परस्थिती परिश्रम करून दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या माथेरान येथील जयेश शिंगाडे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच या विद्यार्थांचा पदवीधर होऊ पर्यंतचा शिक्षणाचा खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक गोविंद पाटील,शिवसेना उपविभागप्रमुख राजेश वीरकर,कोपरी -पाचपाखाडी युवा सेना समन्वयक दीपक झाडे,खोपट एसटी आगार डेपोचे युनियनचे अध्यक्ष सुरेश भांड,प्रतिष्ठानचे सल्लगार सुनील राहिंज,प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर,आदी सह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रात शासकीय व सामाजिक क्षेत्रात धनगर समाजाचे हातावर मोज्यांना इतकेही लोक नसल्याने समाजाचा सर्वांगीण विकास होत नसून यासाठी समाजाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळवायचे असेल तर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे असे शेंडगे यांनी सांगितले. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचे गौरव उद्गार नगरसेविका परिषा सरनाईक यांनी काढले धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य कौतूकास्पद असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव अमोल होळकर,उपाध्यक्ष संतोष बुधे,,खजिनदारअविनाश लबडे,सल्लागार मनोहर वीरकर,सूर्यकांत रायकर  कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,अरुण परदेशी ,सचिन बुधे,प्रशांत कुरकुंडे,ऋषी पिसे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ  सचिव गायत्री गुंड ,खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार संगीत खटावकर,सदस्य सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सल्लागार अर्चना वारे आदीने परिश्रम घेतले 

Web Title: Education is important for community development: Dhangar community leader Jai Singh Tatya Shendge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.