डम्पिंगवर एसी लोकलची कारशेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:03 AM2018-02-08T03:03:22+5:302018-02-08T03:04:06+5:30

पनवेल- डहाणू रेल्वेमार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन तिकीट दरवाढ केली असली, तेथे लोकलसेवा सुरू झालेली नाही. ती व्हावी यासाठी हालचाली सुरू असतानाच आता भिवंडी-खारबावदरम्यान कालवार येथे एसी लोकलची कारशेड आणि वर्कशॉप उभारण्याचे नियोजन एमआरव्हीसीने जाहीर केले.

Dumping AC locally carousel | डम्पिंगवर एसी लोकलची कारशेड

डम्पिंगवर एसी लोकलची कारशेड

Next

भिवंडी : पनवेल- डहाणू रेल्वेमार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन तिकीट दरवाढ केली असली, तेथे लोकलसेवा सुरू झालेली नाही. ती व्हावी यासाठी हालचाली सुरू असतानाच आता भिवंडी-खारबावदरम्यान कालवार येथे एसी लोकलची कारशेड आणि वर्कशॉप उभारण्याचे नियोजन एमआरव्हीसीने जाहीर केले. कालवारमधील सरकारी भूखंडावर डम्पिंग ग्राऊंड तयार करण्याचे नियोजन भिवंडी महापालिका करत असताना अचानक तेथे एसी लोकलची कारशेड करण्याचे नियोजन जाहीर झाले आहे.
मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या मुंबई शहर परिवहन प्रकल्पाच्या तिसºया टप्प्यात पनवेलजवळील मोहापे आणि भिवंडीजवळील कालवार येथे एसी लोकलची कारशेड उभारली जाणार आहे. कालवार येथील जागा १७ एकरांची आहे. या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत थेट लोकल सुरू करावी, अशी मागणी गेल्या वीस वर्षापासून विविध पक्ष संघटना, नेत्यांकडून सुरू आहे. पण त्याला रेल्वेने कायम केराची टोपली दाखवली. सध्या पश्चिम रेल्वेवर अवघी एक एसी लोकल धावते आहे. तिच्या फेºया वाढणे आणि ती मध्य रेल्वेवर धावण्यास दीर्घकाळ जावा लागणार आहे. अशी लोकल भिवंडीत येण्याचे नियोजनही नाही. पण त्याच्या कारशेडसाठी आणि वर्कशॉपसाठी भिवंडीच्या ग्रामीण भागाकडे रेल्वेने मोर्चा वळवला आहे.
कालवार गावातील लोकांनी या सरकारी जागेवर क्रीडांगण उभारण्याचे ठरविले आहे. दापोडा गावातील भिवंडी महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊ ण्ड कालवार येथे स्थलांतरित करण्याचा विचार जिल्हा पातळीवर सुरू होता. मात्र या सर्वांना बगल देत एसी लोकलच्या कारशेडला रेल्वे विकास कॉर्पोरेशनने मंजुरी दिली आहे.
>लोकलची सेवा कधी?
पूर्वीच्या दिवा-वसई आणि आताच्या पनवेल-डहाणू मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यात गाड्यांच्या अपुºया संख्येचे कारण आजवर दिले जात होते. सध्या या मार्गावर मेमू गाड्या धावतात. पश्चिम रेल्वेच्या सुरत मार्गावरील मेमू गाड्या अनेकदा या मार्गावर वळवल्या जातात.
खास करून कोपर ते भिवंडीदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी असूनही येथे फेºयांची संख्या वाढलेली नव्हती. या मार्गाला उपनगरी रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे आणि नुकतीच रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या मार्गावर लोकल सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे जाहीर केले होते.
या मार्गावर लोकल सुरू झाली असती, तर भिवंडी, खारबाव, कामण, जुचंद्र यांचा विकास झाला असता. पण त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केले.
त्यामुळे आधी या मार्गावर लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
>परळची कारशेड हलवणार?
सध्या मेल-एक्स्प्रेससाठीची एसीची कारशेड-वर्कशॉप परळला आहे. मात्र परळ स्थानकाच्या विस्तारात ही कारशेड हलवली जाईल, अशी चर्चा होती. तिचाच काही भाग कालवार आणि काही भाग पनवेलला नेण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर परळ टर्मिनसच्या विस्तारासाठी मुबलक जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
>नव्या ठाण्याची सोय : घोडबंदरच्या समोरच खाडीपलिकडे असलेल्या खारबावमध्ये नवे ठाणे वसवण्याची कल्पना तत्कालीन आयुक्त राजीव यांनी मांडली होती. त्यानंतर खारबावच्या जागेचे दर वाढले, पण कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. मात्र कारशेडच्या निमित्ताने काही प्रकल्प या भागात आले, तर तेथे वर्दळ वाढण्याची चिन्हे आहेत.
>दोन्ही मार्गांना फायदेशीर
कालवार येथे एसी लोकलची कारशेड, वर्कशॉप सुरू झाले, तर तेथून गाड्या कोपर-दिवा मार्गे मध्य रेल्वेवर आणि जुचंद्र-नायगावमार्गे पश्चिम रेल्वेवर नेणे सोयीचे असल्याचे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे. हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने कारशेड दोन्ही रेल्वेमार्गांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
आमच्या संघटनेने लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार अर्ज -विनंत्या केल्या. परंतु काहीच न केल्याने
आजही प्रवासी लोकलच्या प्रतीक्षेत आहेत. मेल व एक्स्प्रेसही भिवंडी रोड स्थानकात थांबत नसल्याने स्थानिक प्रवाशांना या स्थानकाचा उपयोग नाही. या स्थितीत एसी लोकलसाठी तालुकत कारशेड उभारणे प्रवाशांवर अन्याय करणारे आहे.
- सुरजपाल यादव, उपाध्यक्ष, भिवंडी रोड रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन.

Web Title: Dumping AC locally carousel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.