डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:57 PM2018-06-02T15:57:42+5:302018-06-02T15:57:42+5:30

५ जूनपर्यंत आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्र मही ठेवण्यात आले आहेत. तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघू चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Dr. The inauguration of 'Your Environment - Miniature Festival Festival' 2018 concluded by Mahendra Kalyankar | डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन संपन्न

डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन संपन्न

Next
ठळक मुद्देडॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटनआपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८प्रत्येक माणसांपर्यंत पर्यावरणाचे प्रेम, महत्त्व पोहोचावे - डॉ. महेंद्र कल्याणकर

ठाणे : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, वनविभाग ठाणे आणि पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित ‘आपलं पर्यावरण - लघुचित्रपट महोत्सव’ २०१८चे उद्घाटन टाऊन हॉल येथे डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले. आज पर्यावरण दक्षता मंडळासारख्या सामाजिक संस्था या पर्यावरणासाठी इतके भरीव योगदान देत असल्याबद्धल जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी गौरावोद्गार काढले.
    सर्व पर्यावरण प्रेमींच्या दृष्टीने आवडीच्या आणि माहितीपूर्ण अशा ‘आपलं पर्यावरण’ या चित्रपट महोत्सवास आजपासून येथील टाऊन हॉल येथे सुरु वात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले.  डॉ. कल्याणकर म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रचार प्रसार पर्यावरण दक्षता मंडळाने १९ वर्षांपुर्वी केला आणि त्याचा परिणाम आता दिसत आहे. समाजातील प्रत्येक माणसांपर्यंत पर्यावरणाचे प्रेम, महत्त्व पोहोचावे अन्यथा पुढच्या पिढीला काय मिळेल हे सांगणे कठिण आहे. पर्यावरणप्रेमी संस्थांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे प्रेम निर्माण केले पाहिजे. जिल्ह्यात कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून प्रथमच दोन ठिकाणी कांदळवनाची लागवड करण्यात आली. येत्या काळात कांदळवनाचे प्रमाण वाढलेले दिसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कांदळवन लागवडी सारखे उपक्रम राबविण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढे यावे अशा संस्थांना या उपक्रमांसाठी निधी पुरविला जाईल असे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक झाडाचे जिओ टॅगिंग करण्यात आल्याचे सांगत यावर्षी ठाणे जिल्ह्यात ३३ लाख झाडे लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी बोलतांना पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्र म असल्याचे सांगितले. जैवविविधता, पर्यावरण संरक्षण यासाठी या चित्रपटांचा मोठा हातभार लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जून महिन्याच्या ‘आपलं पर्यावरण’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी नाबार्डचे निवृत्त मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ अशोक मेथील, सुजय पत्की, डॉ संजय जोशी यांचीही उपस्थिती होती.

Web Title: Dr. The inauguration of 'Your Environment - Miniature Festival Festival' 2018 concluded by Mahendra Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.