फेरीवाला प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:32 PM2018-07-19T14:32:20+5:302018-07-19T14:34:24+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आहेत, परंतू त्यांच्या खालचे अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये ही समस्या सुटावी अशी इच्छाशक्ती नसल्याची टिका कष्टकरी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केली.

Dismissal of municipal administration's will to solve hawkers question | फेरीवाला प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आभाव

ferivala in dombivli

Next
ठळक मुद्दे आयुक्त सकारात्मक पण अन्य अधिका-यांचे काय?कष्टकरी फेरीवाला संघटनेची टिका

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आहेत, परंतू त्यांच्या खालचे अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये ही समस्या सुटावी अशी इच्छाशक्ती नसल्याची टिका कष्टकरी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केली.
बुधवारच्या बैठकीत २०१४ च्या सर्व्हेनूसार महापालिका क्षेत्रात ९ हजार ५३१ फेरीवाले आहेत. त्यांना योग्य जागा देण्यासाठी आयुक्त बोडके तयार आहेत, पण खालचे अधिकारी नाहीत, त्यामुळे ही समस्या रेंगाळली असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात डोंबिवली स्तरावर सातत्याने प्रभागक्षेत्र अधिकारी, उपायुक्त दर्जाचे अधिकारी आदींना योग्य जागेची पाहणी करण्यासाठी संयुक्त पाहणी दौरा करु असे सांगितले, परंतू ते अधिकारी येत नाहीत. त्यामुळे बैठका एके बैठका एवढेच होते. बैठकीत सकारात्मक पणे चर्चा होते, त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही, त्यामुळे समस्या जैसे थे असल्याचे कांबळे म्हणाले. बुधवारच्या महापालिका मुख्यालयातील बैठकीनंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासन अधिका-यांच्या भेटी घेतल्या. त्यात अधिकारी म्हंटले की आधी जागा खाली करा, अन् मग नव्या जागेचे बघू. त्यावर कांबळेंनी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, जो पर्यंत जागा निश्चिती होत नाही, तोपर्यंत एकही फेरीवाला स्थानक परिसरातील सध्याची त्यांची जागा सोडणार नाही. एकदा जागा सोडली आणि पुन्हा न्याय न मिळाल्यास आम्ही संघटना पदाधिका-यांनी कोणाकोणाला उत्तरे द्यायची असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आयुक्त बोडकेंच्या सूचनांची अंमलबजावणी करा, मोकळी जागा द्या, जेथे वाहनांचा त्रास नागरिकांना नाही आणि फेरीवाल्यांना नाही. तेथे आम्ही जाण्यासाठी सगळयांना सांगू, आवाहन करू. परंतू आधी प्रशासन अधिका-यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणा करावी त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे कांबळे म्हणाले.
रेल्वे स्थानक परिसराला पर्याय म्हणुन टाटा लेन जवळील जागा आयुक्तांना सुचवली आहे, ती जागा योग्य आहे की नाही याबाबतचा निर्णय आयुक्तांनी दिलेला नाही. ते लवकरच कळवणार आहेत - परशुराम कुमावत, ग प्रभागक्षेत्र अधिकारी,डोंबिवली

Web Title: Dismissal of municipal administration's will to solve hawkers question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.