ठाणे जिल्ह्यात हरित क्रांती घडवण्याचा पालकमंत्र्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:57 PM2019-07-01T17:57:53+5:302019-07-01T18:14:05+5:30

ठाणे शहरापासून जवळच असलेल्या मौजे शीळ (गोठेघर), शीळफाटा येथे आज जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्र माचा शुभारंभ शिंदे याच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बालाताना त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Determination of Guardian Minister to create Green Revolution in Thane district | ठाणे जिल्ह्यात हरित क्रांती घडवण्याचा पालकमंत्र्याचा निर्धार

या वर्षी शंभर टक्के झाडे आपण जगवू व हरित ठाणे साकारण्याचा संकल्प करु या

Next
ठळक मुद्देमागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८० टक्के झाडे जगवल्याचा दावाझाडे जगवू व हरित ठाणे साकारण्याचा संकल्पनागरिकांनी, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे : प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या या उत्स्फुर्त सहभागामुळे या वर्षी शंभर टक्के झाडे आपण जगवू व हरित ठाणे साकारण्याचा संकल्प करु या, असा निर्धार व्यक्त करीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य, कुंटुब कल्याण मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८० टक्के झाडे जगवल्याचा दावा केला.

          ठाणे शहरापासून जवळच असलेल्या मौजे शीळ (गोठेघर), शीळफाटा येथे आज जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्र माचा शुभारंभ शिंदे याच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बालाताना त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी, सामाजिक, सेवाभावी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार सुभाष भोईर, मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, पोलीस उप अधिक्षक कुंभारे आदींच्या हस्ते यावेळी वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सिबॉसिल कॉन्वेट स्कूलचे विद्यार्थ सहभागी झाले होते. या प्रत्येक विद्यार्थीनी एक झाड दत्तक घेऊन त्या झाडाची योग्य निगा राखून पुढील वर्षी त्या झाडाचा वाढिदवस साजरा करण्याचा संकल्प केला.

Web Title: Determination of Guardian Minister to create Green Revolution in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.