गुन्हेगारांची चित्रफीत पोलिसांच्या रडारवर, समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारीचे उदात्तीकरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:37 AM2017-09-12T04:37:15+5:302017-09-12T04:37:25+5:30

समाजमाध्यमांच्या मदतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत ठाण्यात व्हायरल झाली आहे. ठाण्यातील १० कुख्यात आरोपींची वजनदार राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे असलेली ही चित्रफीत आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. १० कुख्यात आरोपींचे मोठ्या नेत्यांप्रमाणे सादरीकरण करणारी चित्रफीत गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या चित्रफितीमध्ये उतरत्या क्रमाने १० आरोपींची छायाचित्रे आहेत.

Criminals' video on police radar, criminalization of crime in social media | गुन्हेगारांची चित्रफीत पोलिसांच्या रडारवर, समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारीचे उदात्तीकरण  

गुन्हेगारांची चित्रफीत पोलिसांच्या रडारवर, समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारीचे उदात्तीकरण  

googlenewsNext

ठाणे : समाजमाध्यमांच्या मदतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत ठाण्यात व्हायरल झाली आहे. ठाण्यातील १० कुख्यात आरोपींची वजनदार राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे असलेली ही चित्रफीत आता पोलिसांच्या रडारवर आली आहे.
१० कुख्यात आरोपींचे मोठ्या नेत्यांप्रमाणे सादरीकरण करणारी चित्रफीत गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या चित्रफितीमध्ये उतरत्या क्रमाने १० आरोपींची छायाचित्रे आहेत.
नौपाडा, राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यांत ९ गुन्हे दाखल असलेला आणि सध्या कारागृहात असलेला नौपाड्यातील शिवाजी ऊर्फ शिवा ठाकूर या चित्रफितीमध्ये दहाव्या स्थानावर आहे. राबोडी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असलेला पाचपाखाडी येथील मनीष जाधव नवव्या स्थानावर असून तो सध्या कारागृहात आहे. ९ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आणि सध्या जामिनावर असलेला आरोपी मयूर शिंदे आठव्या, तर ठाणेनगर पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल असलेला आणि सध्या कारागृहात असलेला रविचंद ठाकूर ऊर्फ राजा ठाकूर सातव्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जामिनावर बाहेर असलेल्या भांडुप येथील अमित मधुकर भोगले, नवी मुंबई येथील अन्नू ऊर्फ किशोर शैलेंद्र आंग्रे, वागळे इस्टेट येथील राजेंद्र मच्छिंद्र परदेशी ऊर्फ बारक्या, भिवंडी येथील सुजित ऊर्फ तात्या मधुकर पाटील यांची ठाण्यातील नेत्यांसोबतची छायाचित्रे चित्रफितीमध्ये झळकतात. या चित्रफितीनुसार तेलीगल्ली येथील राजेश भालचंद्र गवारी ऊर्फ राजाभाऊ गवारी हा ठाण्यातील दुसºया क्रमांकाचा डॉन असून पहिल्या क्रमांकावर सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धू अभंगे हा आहे. सिद्धू सध्या जामिनावर बाहेर असून तडीपार असतानाही त्याचा काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
चित्रफितीवर निर्माता म्हणून पॉवर डायरेक्टरचा उल्लेख आहे. चित्रफितीमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. निरंजन डावखरे, आ. रवींद्र फाटक, काँग्रेस नेते नारायण राणे, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज प्रधान, श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच अभिनेता सुनील शेट्टी आदी मान्यवरांसोबत या गुन्हेगारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.
राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे सर्वत्र पसरवून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया या चित्रफितीची गंभीर दखल खंडणीविरोधी पथकाने घेतली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाची धुरा चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे असून त्यांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. चित्रफीत कुणी तयार केली, कुणी फॉरवर्ड केली याबाबत तांत्रिक चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तीन आरोपींची पेशी : चित्रफितीमधील दहापैकी तीन आरोपींची या प्रकरणामध्ये खंडणीविरोधी पथकासमोर शनिवारी पेशी झाली. अधिकाºयांनी त्यांना चित्रफितीसंदर्भात विचारणा केली. चित्रफीत आम्ही तयार केली असती, तर स्वत:ला पहिल्या क्रमांकावर दाखवले असते, असे या आरोपींनी अधिकाºयांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Criminals' video on police radar, criminalization of crime in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस