कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:48 AM2019-06-26T00:48:51+5:302019-06-26T00:49:16+5:30

केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कच-याऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता.

Corruption in the Trash: Offense Against the House Leader | कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा

कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा

Next

कल्याण : केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कचºयाऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर रात्रीही त्यांनी कचºयाचा डम्पर पकडला. त्यातील कचºयाचे वजन चुकीचे दाखविले गेल्याचा आरोप समेळ यांनी केल्याने तेथे कंत्राटदाराच्या प्रतिनिधीशी समेळ यांचा वाद झाला. यावेळी कंत्राटदाराचे काही लोक समेळ यांच्या अंगावर धावून आले. मात्र, समेळ यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची तक्रार कंत्राटदाराने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समेळ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, समेळ यांनी कचºयाचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.
कचरा कंत्राटदाराचे कामगार कचºयाऐवजी डेब्रिज गोळा करून त्याचे वजन दाखवून महापालिकेकडून पैसे उकळत असल्याचा आरोप समेळ यांनी महासभेत केला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी आधारवाडी डम्पिंगवर कचºयाऐवजी डेब्रिज घेऊन जाणारा डम्पर पकडला होता. त्यानंतर रात्री तसाच एक डम्पर डम्पिंगवर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे ते तेथे ९.३० वाजता पोहोचले. तेथे कंत्राटदार कंपनीचा प्रतिनिधी व कामगारांनी समेळ यांच्याशी वाद घातला. तो विकोपाला गेल्याने काही कामगार व कंत्राटदाराचा प्रतिनिधी समेळ यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा समेळ यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. दुसरीकडे समेळ यांनीच धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची तक्रार कंत्राटदाराने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसरीकडे या घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार यांच्याशी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी चर्चा केली. कंत्राटदाराची इतकी हिम्मत कशी वाढते की तो सदस्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतो. सदस्याने चुकीचा प्रकार उघडकीस आणायचा नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मी गैरप्रकार उघड केल्याने कंत्राटदार माझ्याविरोधात बनाव करत आहे. कंत्राटदाराच्या एका कामगाराने डंपरवर डोके आपटून स्वत:ला दुखापत करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगाराला मी मारहाण केल्याचे कंत्राटदाराला भासवायचे होते, याकडे समेळ यांनी लक्ष वेधले.

असाच प्रकार यापूर्वीही घडला होता

कचºयातील अशाच पद्धतीचा गैरप्रकार केडीएमसीत काही वर्षांपूर्वी मनसेचे माजी नगरसेवक उल्हास भोईर यांनी उघड केला होता. तेव्हाही प्रकरण पोलिसात गेले होते.
त्यावेळी नगरसेवकांनी हा विषय महासभेत उचलून धरला होता. त्यामुळे कंत्राटदार अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे सांगून तत्कालीन आयुक्तांनी कंपनीचे कंत्राट रद्द केले होते.
त्यानंतर या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कचरा गोळा करण्याचे कंत्राट न देता महापालिकेच्या कर्मचारी वर्गाकडून हे काम गेले जात होते.
मात्र, आता पुन्हा कंत्राटदाराला हे काम दिल्याने तोच प्रकार होत असल्याचा आरोप समेळ यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा कंपनीचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी महासभेत केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Corruption in the Trash: Offense Against the House Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.