खोट्या माहितीव्दारे शिक्षकांचे बदल्यांमध्ये चांगभले; अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:28 PM2019-03-09T18:28:02+5:302019-03-09T18:32:26+5:30

या प्राथमिक शिक्षकांच्याआॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासननिर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली

Changes in teacher transfers through false information; The unjust teachers are ready to go to court | खोट्या माहितीव्दारे शिक्षकांचे बदल्यांमध्ये चांगभले; अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे.

Next
ठळक मुद्देशिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती.अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीबदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा

ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मंगळवारी झाल्या. मात्र, काही शिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती दिल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून या खोट्या माहितीची वेळीच शहानिशा करून हा अन्याय दूर करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे.
        या प्राथमिक शिक्षकांच्याआॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासननिर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली आहे. अवघड क्षेत्रातील शाळे ऐवजी सोपा क्षेत्राच्या शाळेत बदल्या झालेल्या शिक्षकांच्या माहितीची व वैद्यकीय दाखल्यांची खातर जमा वेळीच न केल्यास संबंधीत अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयाचे दरवाज थोटावण्याच्या तयारीत आहे.
भागाऐवजी सोप् बदली झालेल्या
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत या आॅनलाइन बदल्या पुणे येथून ‘एनआयसी’ यंत्रणेव्दारे केल्या आहेत. सर्व बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णया प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले असताना देखील याचे उल्लंघन होऊन या बदल्यांची प्रक्रि या राबवल्या आहेत, त्यात अनेक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन बहुतांशी पात्र व सेवा जेष्ठता असलेल्या शिक्षकाना आदिवासी दुर्गमभागातील आवघड क्षेत्राच्या शाळांवर जाण्याचा प्रसंग ओढावला आहे. या मध्ये महिला शिक्षकांचाही मोठ्याप्रमाणात समावेश आहे.
या बदल्यांमध्ये पतीपत्नी चे एकत्रीकरण करताना दोघाच्या शाळेतील अंतर ३० किलोमीटर असल्याची खोटी माहिती नोंदवण्यात आली असल्याचे ऐकायला मिळत आहे. या बदल्यांमध्ये ठाणे जिल्हातीलच शिक्षकांना पतीपत्नी एकत्रीकरणाच लाभ मिळावा असे शासननिर्णयात नमुद केले आहेत. पण इतर जिल्हा परिषदेच्या ३० किलोमीटरच्या शाळा दाखवून लाभ घेतल्याचे बोलले जात आहे. जुनी शाळा अवघड क्षेत्रातील शाळा असल्याचे दाखवून लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये विशेषत: पालघर जिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकाची शाळा अवघड नसताना देखील ती शाळा अवघड असल्याचे दाखवून सोयीच्या शाळेचा लाभ घेतल्याचे दिसून येत असल्याची जोरदार चर्चा आहे. याची प्रशासनाने खातर जमा करण्यासह दुर्धर आजाराचे खोटे दाखले दिल्याचे बोलले जात आहे. याप्रमाणेच विविध संवर्गात लाभ घेणाऱ्याा शिक्षकांची कागदपत्रे, पतीपत्नीचे अंतर प्राथमिक स्तरावर तपासून खातरजमा न केल्याने त्यांना प्राधान्यक्र माचा लाभ सरसकट दिल्याने इतरांवर अन्याय झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Changes in teacher transfers through false information; The unjust teachers are ready to go to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.