‘बुलेट ट्रेन फेक दो’च्या घोषणांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:48 AM2018-05-30T04:48:54+5:302018-05-30T04:48:54+5:30

बुलेट ट्रेन पर्यावरण, भूगर्र्भातील जीवितांसाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांकरिता घातक असल्याने

'Bullet Train Fake Do' alarm announcements | ‘बुलेट ट्रेन फेक दो’च्या घोषणांचा गजर

‘बुलेट ट्रेन फेक दो’च्या घोषणांचा गजर

Next

ठाणे : बुलेट ट्रेन पर्यावरण, भूगर्र्भातील जीवितांसाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांकरिता घातक असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाऊ देणार नसल्याचा निर्धार मंगळवारी शेतकºयांनी बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय जनसल्लासमलत बैठकीत व्यक्त केला. ‘फेक दो, फेक दो, बुलेट ट्रेन फेक दो’ अशा घोषणा देत बैठकीत शेतकºयांनी काही काळ गोंधळ घातला.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी जिल्ह्यातील १९ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. तत्पूर्वी बुलेट ट्रेन पर्यावरणाकरिता घातक असल्याच्या चर्चेला वेग आल्याने या ट्रेनमुळे पर्यावरणाला बाधा होणार नाही, हे पटवून देण्याकरिता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हादंडाधिकारी शिवाजी पाटील होते. बुलेट ट्रेनचे मुख्य प्रकल्प अधिकारी यू. पी. सिंग, प्रकल्प अधिकारी आर. पी. सिंग, पर्यावरण विषयक अभ्यासक आदींसह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. या बैठकीला म्हणावी तेवढी
गर्दी झाली नाही. शेतकºयांना या बैठकीची पूर्वसूचना न मिळाल्याने ते उपस्थित नव्हते, असे काहींनी सांगितले. तर मुळात बुलेट ट्रेनला विरोध असल्याने तिकडे फिरकायचेच कशाला, असा विचार शेतकºयांनी केला असल्याचे काहींचे म्हणणे
होते.
बैठकीत बुलेट ट्रेनमुळे पर्यावरण विषयक हानी होणार नसल्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या तासाला उपस्थितांनी अधिकाºयांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. बुलेट ट्रेनमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही हा दावा पटत नाही, भूमिगत ट्रेनमुळे खाडीतील जनजीवनही विस्कळीत होणार आहे, परदेशी फ्लेमिंगोंना याचा त्रास होणार आहे, कांदळवनाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे, कांदळवनाची हानी झाल्यानंतर त्याची लागवड पुन्हा करता येत नाही, हे सिद्ध झाले आहे, येथील स्थानिक आगरी, कोळी आणि भूमिपुत्रांची आर्थिक हानी होणार असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले. जमिनीचा सर्व्हे करताना शेतकºयांना विश्वासात घेतले गेले नाही, साध्या नोटिसा देण्याचे सौजन्य शासनाने दाखवले नाही. एवढ्या मोठ्या प्रकल्पाबाबत अशी दडवादडवी का केली जातेय? जबरदस्तीने शेतकºयांच्या जमिनींची मोजणी करण्यात आली, असे नाना सवाल उपस्थित करून शेतकºयांनी प्रशासकीय अधिकाºयांना सळो की पळो करून सोडले. \

शासकीय अधिकाºयांची या प्रश्नांना उत्तर देताना दमछाक झाली. अखेरीस तुम्ही तुमच्या सूचना, हरकती लेखी स्वरूपात कळवू शकता, पुढील महिनाभरात तुम्ही तुमच्या सूचना नोंदवा, असे म्हणत अधिकाºयांनी आपली सुटका करून घेतली. आम्हाला बुलेट ट्रेन नकोच आहे. ज्या गावाला जायचेच नाही, त्या गावाची माहिती तरी कशाला घ्यायची, असे उच्चरवात सांगत काही शेतकºयांनी हरकती व सूचना दाखल करण्यास विरोध केला.
केवळ एका माणसाच्या अट्टाहासापायी हा आटापिटा सुरू असल्याचा टोला शेतकºयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता लगावला. शेतकरी व पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांच्या काही अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे अधिकाºयांना देता आली नाहीत.
अखेरीस शेतकºयांनी ‘फेक दो, फेक दो, बुलेट ट्रेन फेक दो’ अशा घोषणा करीत, या प्रकल्पाला आमचा १०० टक्के विरोध असल्याचे जाहीर केले. काही शेतकरी सुनावणीनंतरही अधिकाºयांशी हुज्जत घालत होते. तुम्ही कितीही जनसुनावणी घेतल्या तरी आमचा विरोध कायम असेल, असा इशारा या वेळी शेतकºयांनी अधिकाºयांना दिला.

Web Title: 'Bullet Train Fake Do' alarm announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.