रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:23 PM2022-06-04T18:23:55+5:302022-06-04T18:26:23+5:30

Accident Case : रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

An old man died after being hit by a vehicle while crossing the road in Thane | रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना ठाण्यात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

Next

ठाणे : घोडबंदर रोड ओवळा नाका येथे रस्ता ओलांडताना एका अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत ओवळा नाका येथील विलास रामकृष्ण दोंडे (७९) हे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

रस्ता ओलांडणाऱ्या दोंडे यांना अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 

Web Title: An old man died after being hit by a vehicle while crossing the road in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.