अखेर एमएसईबीच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी झाली गोड, पगार आणि बोनस पडला हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:53 PM2017-10-19T15:53:37+5:302017-10-19T15:58:10+5:30

महावितरणच्या ३०० कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या कर्मचार्‍याच्या हाती थकीत पगार आणि बोनसची रक्कम पडली आहे. त्यामुळे आता त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे.

After all, MSEB workers contracted for Diwali, salaries and bonuses fall | अखेर एमएसईबीच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी झाली गोड, पगार आणि बोनस पडला हाती

अखेर एमएसईबीच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी झाली गोड, पगार आणि बोनस पडला हाती

Next
ठळक मुद्देतीन महिन्यापासून पगार नसल्याने कर्मचार्‍याचे सुरु होते आंदोलनदिवाळीच्या पहिल्या दिवशी सांयकाळी पगार आणि बोनसचे वाटपठेकेदार आणि महावितरणच्या आडमुठ्या अधिकार्‍यामुळे थकले होते पगार

ठाणे - महावितरणच्या भांडूप नागरी परीमंडळाच्या ठाणे व वाशी मंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे ३०० हून अधिक कंत्राटी कर्मचार्‍याना मागील तीन ते पाच महिन्यांचे पगार थकले होते. त्यामुळे या कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच, या वृत्ताची दखल घेत तातडीने महावितरण या कर्मचार्‍याना बुधवारी सांयकाळी पगार आणि बोनसही देण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचार्‍याचे जून, जुलै व आॅगस्ट महिन्याच्या पगाराची बिले ठेकेदाराने सादर केली असून त्याच्यावर अजूनही योग्य ती कार्यालयीन प्रक्रि या पूर्ण न केल्याने कंत्राटी कर्मचार्‍याचा हा पगार होणार नाही असा पवित्रा मुखालयाने घेतला होता. ऐन दिवाळीच्या काळातही केवळ ठेकेदार आणि महापावितरणच्या काही आडमुठ्या अधिकार्‍यामुळे या कर्मचार्‍याची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे या कर्मचार्‍यानी मागील काही दिवसापासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. केवळ अधिकार्‍याच्या चुकीमुळेच कर्मचार्‍याची दिवाळी अंधारात जात असल्याचा आरोप संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला होता. परंतु या संदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच, अवघ्या एकाच दिवसात या कामगारांचा पगार देण्यात आला असून बोनसची रक्कमही देण्यात आली आहे.
दरम्यान पगार देत असतांना संपूर्ण थकबाकी मात्र अद्यापही अदा झालेली नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यामध्ये काहीसा नाराजीचा सुर देखील आहे. त्यातही कंत्राटदार आणि ठाणे सर्कलच्या काही अधिकार्‍यामध्ये असलेल्या संगनमतामुळे देखील कर्मचार्‍याचे पगार वेळेत होत नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.





 

Web Title: After all, MSEB workers contracted for Diwali, salaries and bonuses fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.