२३ लाख ठाणेकरांच्या बोटाला लागणार तब्बल २७ लीटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:45 AM2019-04-24T01:45:14+5:302019-04-24T01:45:30+5:30

ठाण्यासाठी लागणार शाईच्या दोन हजार ७०० बाटल्या

27 lakhs ink to 23 lakh Thanekar's finger | २३ लाख ठाणेकरांच्या बोटाला लागणार तब्बल २७ लीटर शाई

२३ लाख ठाणेकरांच्या बोटाला लागणार तब्बल २७ लीटर शाई

googlenewsNext

- सुरेश लोखंडे 

ठाणे : मतदानाचा हक्क बजावणे, हे प्रत्येक नागरिकाचे प्रथमकर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या या मतदानासाठी डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील तर्जनीवर शाई लागलेली दिसून आल्यास मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याचे लक्षात येते. ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यादिवशी ठाणे लोकसभेचे २३ लाख सात हजार २३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्या बोटाला सुमारे २७ लीटर निळी शाई लावण्याचे नियोजन आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ही निवडणूक होणार असून ठाणेकरांसाठी दोन हजार ७०० बाटल्या इतकी निळी शाई लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ठाण्याप्रमाणेच कल्याण व भिवंडीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनीही या शाईचे नियोजन केले आहे.
मतदानासाठी लागणाºया साहित्याची जुळवाजुळव जवळजवळ पूर्ण झाली आहे. यात निळी शाई अत्यंत महत्त्वाची असून त्याद्वारे मतदानाचा हक्क बजावल्याची ओळख पटते. सुमारे १५ दिवस तरी ती बोटाला दिसते. एका बाटलीत सुमारे १० मिली शाई असते. ठाणेकरांसाठी असलेल्या ३८१ ठिकाणी दोन हजार ४५२ मतदानकेंद्रे आहेत. तेथे या निळ्या शाईचा वापर होणार आहे. २००४ पर्यंतच्या मतदानासाठी केवळ निळ्या शाईचा एक ठिपका मतदाराच्या बोटाला लावला जात असे. पण, निवडणूक आयोगाने २००६ पासून मतदाराच्या डाव्या बोटावर शाईची सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. यामुळे आता जास्त शाई लागते.

कोणत्या बोटावर लागते शाई
मतदानकेंद्रांवर मतदाराची ओळख पटवल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.

म्हैसूरची शाई
संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे.

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.

Web Title: 27 lakhs ink to 23 lakh Thanekar's finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.