जिल्ह्यातील आरटीईच्या शालेय प्रवेशासाठी १४७२० अर्ज ग्राह्य ; सात हजार अर्ज नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 06:41 PM2019-03-25T18:41:33+5:302019-03-25T18:50:02+5:30

जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत.

14720 applications for school admission to RTE in the district; Seven thousand applications were rejected | जिल्ह्यातील आरटीईच्या शालेय प्रवेशासाठी १४७२० अर्ज ग्राह्य ; सात हजार अर्ज नाकारले

शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत

Next
ठळक मुद्देगरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेशजिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेशनवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या जागी प्रवेश मिळवण्यासाठी २१ हजार ६५० अर्ज दाखल झाले. पण त्यातील केवळ १४ हजार ७२० प्रवेश अर्ज ग्राह्य धरले आहेत. उर्वरित सहा हजार ९३० अर्ज रद्द केले. या रद्द ठरलेल्या अर्जांमध्ये संबंधीत पालकानी योग्य दुरूस्ती त्वरीत करणे अपेक्षित आहे. याशिवाय नवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत. या रद्द केलेल्या अर्जात योग्य ती दुरूस्ती करून पालकानी ते पुन्हा आॅनलाइन दाखल करता येतील. सीनिअर केजीसाठी जागा नसलेल्या शाळाना बहुतांशी पालकांनी पसंती दिली आहे. त्यामुळेच सुमारे ९९ टक्के अर्ज रद्द ठरल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
आपला प्रवेश अर्ज ग्राह्य धरला की नाही, याची खातरजमा संबंधीत पालकांनी त्वरीत करण्याची अपेक्षा आहे. ग्राह्य न धरलेल्याअर्जातील दुरूस्तीसह योग्य पसंतीच्या शाळा पालकांनी नमुद करून ते अर्ज पुन्हा आॅनलाइन संमिट करण्याची संधी या पालकांना देण्यात आली आहे. या आधी अर्ज न केलेल्या पालकांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन पाल्याचा प्रवेश अर्ज त्वरीत आॅनलाइन करणे अपेक्षित आहे.पालकांनी हा प्रवेश अर्ज www.student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दाखल करणे आवश्यकआहे. जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये होणा-या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश आरटीईव्दारे दिले जात आहे. त्यासाठी या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या आरक्षित ठेवलेल्या १३ हजार ४०० प्रवेशापैकी ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात दिले जाणार आहे. तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीत दिले जाणार आहेत. म्हणजे केजीत प्रवेश दिला जाणार आहे.

Web Title: 14720 applications for school admission to RTE in the district; Seven thousand applications were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.