US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:26 AM2018-09-04T10:26:18+5:302018-09-04T10:28:39+5:30

US Open Tennis: महान टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

US Open Tennis: Roger Federer's shocking defeat | US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी

US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी

Next

मेलबर्नः महान टेनिसपटूरॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने 3-6, 7-5, 7-6(9/7), 7-6(7/3) अशा फरकाने बाजी मारली. त्याच्यासमोर उपांत्यपूर्व फेरीत नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे.



पाच वेळा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला चौथ्या फेरीत विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 2-1 अशी आघाडी घेतली. मिलमनच्या या पलटवाराने फेडरर चाहते धक्क्यात वावरत होते. मिलमनने पुढील सेट जिंकले. 


फेडररने पहिला सेट 6-3 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने योग्य सुरुवात केली, परंतु त्याला पुढील सेटमध्ये अनपेक्षित चुरस अनुभवायला मिळाली. ब्रिस्बनचा रहिवाशी असलेल्या मिलमनने प्रथमच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने चौथ्या सेटमध्येही फेडररला झुंजवले. हाही सेट टायब्रेकरमध्ये गेला आणि त्याने विजय मिळवला.

 

Web Title: US Open Tennis: Roger Federer's shocking defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.