डॉमनिक थीमचा शानदार विजय; नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:03 AM2018-04-21T02:03:18+5:302018-04-21T02:03:18+5:30

दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सध्या सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीआधीच जोकोविचला आपला गाशा गुंडाळावा लागला.

 The triumph of the Dominican theme; Due to the challenge of Novak Djokovic | डॉमनिक थीमचा शानदार विजय; नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

डॉमनिक थीमचा शानदार विजय; नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

Next

मोनॅको (फ्रान्स) : दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सध्या सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीआधीच जोकोविचला आपला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थीम याने २-१ असा विजय मिळवत जोकोविचला धक्का दिला.
पुरुषांच्या एकेरीमध्ये आॅस्ट्रियाच्या थीमने शानदार खेळ करताना पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत बाजी मारली. पहिला सेट जोकोविचने ७-६ असा जिंकल्यानंतर पुढील दोन्ही सेट थीमने जिंकत ६-७(२), ६-२, ६-३ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पुढील आठवड्यामध्ये जोकोविच हंगेरी ओपन किंवा बार्सिलोना ओपन स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. (वृत्तसंस्था)

- या पराभवानंतरही जोकोविचने समाधान व्यक्त केले असून
तो म्हणाला की, ‘स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांत मला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. एकूणच ज्या प्रकारे
सर्व गोष्टी सुरू आहेत,
त्यावर मी खूश आहे.’

Web Title:  The triumph of the Dominican theme; Due to the challenge of Novak Djokovic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा