आजपासून भारताची मोहीम सुरू, डेव्हिस कप विश्वगट पात्रता, बलाढ्य कॅनडाविरुद्ध करणार दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:52 AM2017-09-15T01:52:21+5:302017-09-15T01:52:48+5:30

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल.

 From today, India's campaign will begin, Davis Cup World Cup qualifying, strong Canada will have two hands | आजपासून भारताची मोहीम सुरू, डेव्हिस कप विश्वगट पात्रता, बलाढ्य कॅनडाविरुद्ध करणार दोन हात

आजपासून भारताची मोहीम सुरू, डेव्हिस कप विश्वगट पात्रता, बलाढ्य कॅनडाविरुद्ध करणार दोन हात

Next

एडमंटन : डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल.
कॅनडाच्या कसलेल्या डेनिस शापोवालावविरुद्ध या दोघांनाही आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. डापोवालावने माँट्रीयल मास्टर्स स्पर्धेत दिग्गज खेळाडू राफेल नदालला धक्का देत टेनिस विश्वाचे लक्ष वेधले होते. यानंतर, त्याने यूएस ओपनची चौथी फेरी गाठणारा सर्वांत लहान खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला होता. १८ वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानी असलेल्या शापोवालोवने गेल्या काही महिन्यांमध्ये शानदार खेळ करताना जुआन मार्टिन डेल पेत्रो आणि जो विल्फ्रेड त्सोंगा यांनाही पराभूत करण्याची कामगिरी केली.
या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीत भारताची मदार युकी आणि रामकुमार यांच्यावर असेल. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच गेल मोंफिल्स आणि डॉमनिक थिएम या नावाजलेल्या खेळाडूंना पराभूत करत टेनिस विश्वात खळबळ माजवली होती. युकी सध्या १५७व्या स्थानी असून रामकुमार १५४व्या स्थानी आहे. या दोघांनाही अनुभवाच्या कमतरतेमुळे अनेकदा महत्त्वाच्या लढतींमध्ये पराभवास सामोरे जावे लागले आहे. मात्र, या दोघांचाही गेल्या काही महिन्यातील खेळ पाहता, नक्कीच शापोवालोवला पराभूत करण्यात हे दोघे यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
खेळाडू म्हणून युकी परिपक्व झाला असून त्याने डेव्हिस कपच्या तणावपूर्ण सामन्यांमध्ये कणखर मानसिकता दाखवली आहे. गेल्या काही सामन्यांत त्याने जे विजय मिळवले आहेत, त्यातून तो प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या प्रकारे हातळण्याची क्षमता राखून असल्याचे सिद्ध झाले. दुसरीकडे, रामकुमारने आपल्या वेगवान आणि मोठ्या सर्व्हिस तसेच चांगल्या तंदुरुस्तीच्या जोरावर भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

कॅनडाचा अन्य एक खेळाडू वासेक पोसपिसिल जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी आहे. मात्र त्याचे फारसे दडपण युकी व रामकुमार यांच्यावर नसेल. वासेकने याआधीच्या आपल्या पाचही सामन्यात सलग पराभव पत्करला असून नुकताच झालेल्या यूएस ओपनमध्येही तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. युकीने २०१४ साली चेन्नई ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोसपिसिलचा सामना केला होता. त्या लढतीत युकी पराभूत झाला होता. तसेच, रामकुमार आतापर्यंत एकदाही पोसपिसिलविरुद्ध खेळलेला नाही.

युकी आणि रामकुमार यांनी पहिल्या दिवशी गुण मिळवण्यात यश मिळवले, तर हा सामना जिंकण्यासाठी भारत मजबूत स्थितीमध्ये येईल. त्याचवेळी, कॅनडाचा जागतिक क्रमवारीतील ११वा खेळाडू मिलोस राओनिच याच्या अनुपस्थितीमध्ये भारताकडे हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी असेल, असे मत टेनिसतज्ज्ञांनी मांडले आहे.

सलग चौथ्या वर्षी भारतीय संघ विश्व गटात पात्रता मिळवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. याआधी तीन वर्ष भारताला प्ले आॅफमध्ये सर्बिया (बंगळुरू २०१४), झेक प्रजासत्ताक (नवी दिल्ली २०१५) आणि स्पेन (नवी दिल्ली २०१६) यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

Web Title:  From today, India's campaign will begin, Davis Cup World Cup qualifying, strong Canada will have two hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.