Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

By सिद्धेश जाधव | Published: November 2, 2021 01:19 PM2021-11-02T13:19:04+5:302021-11-02T13:21:20+5:30

Xiaomi Redmi Note 11 Price And Launch In India: Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात लाँच होईल परंतु या फोनचे नाव भारतात Redmi Note 11T असे ठेवण्यात येईल.

Xiaomi Redmi Note 11 to launch in India as Redmi Note 11T 5G  | Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

Redmi Note 11 India Launch: शाओमीचा नवीन किफायतशीर 5G फोन Redmi Note 11 भारतात येणार परंतु... 

googlenewsNext

शाओमी गेल्या महिन्यात चीनमध्ये ‘रेडमी नोट 11’ सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वी यातील रेडमी नोट 11 प्रो आणि नोट 11 प्रो प्लस भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर दिसले होते. त्यामुळे या फोन्सच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु झाली होती. हे फोन्स भारतात लाँच होतील परंतु यात एक ट्विस्ट आहे.  

Redmi Note 11T 5G Phone बाबत एक लीक एका टिपस्टरने सोशल मीडियावर शेयर केला आहे. या लीकनुसार Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात लाँच होईल परंतु या फोनचे नाव भारतात Redmi Note 11T असे ठेवण्यात येईल. तसेच तर रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट 11 प्रो प्लसच्या नावात कोणताही बदल केला जाणार नाही.  

Redmi Note 11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स  

Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा डेप्थ सेन्सर आलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

Redmi Note 11 ची किंमत  

चीनीमध हा रेडमी फोन चार व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे.  

  • Redmi Note 11 4GB/128GB: 1199 CNY (अंदाजे 14,000 रुपये)   
  • Redmi Note 11 6GB/128GB: 1299 CNY (अंदाजे 15,200 रुपये)  
  • Redmi Note 11 8GB/128GB: 1499 CNY (अंदाजे 17,500 रुपये)   
  • Redmi Note 11 8GB/256GB: 1699 CNY (अंदाजे 19,800 रुपये)  

Web Title: Xiaomi Redmi Note 11 to launch in India as Redmi Note 11T 5G 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.