हॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये करु नका ही कामे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:47 PM2018-10-02T12:47:52+5:302018-10-02T12:48:13+5:30

डिजिटल वर्ल्डमध्ये सर्वात जास्त धोका हा हॅकिंगचा असतो. हॅकर्स आपल्या फोनमधून आपली खाजगी माहिती चोरी करतात. आपल्या वाय-फायपासून ते स्मार्टफोनपर्यंत काहीच सुरक्षित नाहीये.

Tips to protect your smartphone from hackers | हॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये करु नका ही कामे!

हॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये करु नका ही कामे!

Next

डिजिटल वर्ल्डमध्ये सर्वात जास्त धोका हा हॅकिंगचा असतो. हॅकर्स आपल्या फोनमधून आपली खाजगी माहिती चोरी करतात. आपल्या वाय-फायपासून ते स्मार्टफोनपर्यंत काहीच सुरक्षित नाहीये. जर तुम्हाला तुमचा फोन हॅकर्सपासून वाचवायचा असेल तर काही टिप्सने तुम्हाला मदत होऊ शकते. या टिप्सने तुम्ही मोबाईल हॅक होण्यापासून बचाव करु शकता.

कसा होतो मोबाईल हॅक

जर तुम्ही असुरक्षित किंवा पब्लिक Wi-Fi चा वापर करत असाल तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तसेच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या USB ने फोन चार्ज केल्यानेही मोबाईल हॅकिंगचा धोका होऊ शकतो. त्यासोबतच फोनवर येणाऱ्या अज्ञात लिंक्सद्वारेही फोन हॅक होऊ शकतो. 

फोन हॅक होण्याचे संकेत

जर तुमचा फोन हॅंग किंवा वापर न करताही गरम गोत असेल तर हा फोन हॅक झाल्याचा संकेत असू शकतो. त्यासोबतच फोन स्वत:हून रिबूट होत असेल किंवा स्विच ऑफ होत असेल तर हा सुद्धा फोन हॅक झाल्याचा संकेत आहे. जर तुम्ही फोन स्विच ऑफ करत आहात आणि तो बंद होत नसेल तर ही सुद्धा धोक्याची घंटी असू शकते. 

कसा कराल बचाव

जर तुमच्या फोनवर अर्धवट लिंक असलेला मेसेज आला असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका. कम्प्युटरने फोन चार्च करताना Only charging हाच पर्याच निवडा.  ” remember passwords” या पर्यायावर क्लिक करणे टाळा. याने हॅकिंगचा धोका वाढतो. पब्लिक वाय-फायचा वापर करताना ऑटोमॅटिक कनेक्शन पर्यायाला बंद करा. शक्यतो पब्लिक वाय-फायच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करणे टाळा. यानेही फोन हॅक केला जाऊ शकतो. 

Web Title: Tips to protect your smartphone from hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.