32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच

By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 07:41 PM2022-02-28T19:41:21+5:302022-02-28T19:41:37+5:30

Samsung Galaxy Book 2 Pro 360: कंपनीनं या लॅपटॉप्समध्ये 12th जेनरेशन इंटेल कोर i7 आणि कोर i5 प्रोसेसर दिले आहेत.

Samsung Galaxy Book 2 Pro And Book 2 Pro 360 Launched In MWC 2022   | 32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच

32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच

googlenewsNext

Samsung नं मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) च्या माध्यमातून Galaxy Book 2 Pro आणि Galaxy Book 2 Pro 360 असे दोन लाँच केले आहेत. सिल्वर आणि ग्रॅफाइट रंगात येणाऱ्या गॅलेक्सी बुक 2 प्रो ची किंमत 1049 डॉलर (सुमारे 79,300 रुपये) आहे. तर, बर्गंडी, ग्रॅफाइट आणि सिल्वर रंगातील गॅलेक्सी बुक 2 प्रो 360 ची किंमत 1249 डॉलर (सुमारे 94,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. दोन्ही लॅपटॉप 1 एप्रिलपासून यूएसमध्ये उपलब्ध होतील.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

गॅलेक्सी बुक 2 प्रोमध्ये 13.3 इंच आणि गॅलेक्सी बुक 2 प्रो 360 मध्ये 15.6 इंचाची स्क्रीन आहे. दोन्ही लॅपटॉपमध्ये कंपनी 16:9 अस्पेक्ट रेशियोसह फुल एचडी रेजॉलूशन असलेला अ‍ॅमोलेड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 500 निट्सची पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. हे टच स्क्रीन लपतो S Pen सपोर्टसह बाजारात आले आहेत. 

दमदार साउंडसाठी कंपनीनं यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ड्युअल स्टिरियो 4 स्पिकरचा वापर केला आहे. कनेक्टिविटीसाठी यात थंडरबोल्ट 4 आणि वाय-फाय 6E सह अनेक ऑप्शन मिळतात. बुक 2 प्रोचं वजन 1.04kg आणि बुक 2 प्रो 360 चं वजन 1.41kg आहे. 

कंपनीनं या लॅपटॉप्समध्ये 12th जेनरेशन इंटेल कोर i7 आणि कोर i5 प्रोसेसर दिले आहेत. दोन्ही लॅपटॉप 32GB पर्यंत LPDDDR5 RAM आणि 1TB पर्यंतची NVMe SDD स्टोरेज मिळते. दोन्ही मॉडेल विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. बुक 2 प्रो मध्ये 63Wh आणि बुक 2 प्रो 360 मध्ये 68Wh ची बॅटरी मिळते. सोबत 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. ही बॅटरी बॅटरी सिंगल चार्जवर 21 तासांपर्यंतचा बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.  

हे देखील वाचा:

 

Web Title: Samsung Galaxy Book 2 Pro And Book 2 Pro 360 Launched In MWC 2022  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.