Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 02:55 PM2018-11-28T14:55:43+5:302018-11-28T15:00:29+5:30

Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Realme U1 India launch highlights: Realme U1 starts at Rs 11,999 | Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स...

Realme U1 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स...

Next
ठळक मुद्देRealme U1 स्मार्टफोन भारतात लाँचMediaTek चा नवीन Helio P70 प्रोसेसरRealme U1 स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक, रेड आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार

नवी दिल्ली : Realme कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Realme U1 असा हा स्मार्टफोन आहे. MediaTek चा नवीन Helio P70 प्रोसेसर असलेला जगातील पहिला Realme U1 स्मार्टफोन आहे. कंपनीने दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. 

Realme U1 स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक, रेड आणि गोल्ड कलरमध्ये मिळणार आहे. 3  जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी असलेला स्मार्टफोन 14,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनचा सुरुवातीला सेल 5 डिसेंबरला दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.  

Realme U1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
-  ड्युअल सिम
- अँड्राईड 8.1 ओरिओ बेस्ड ColorOS 5.2 
- 2.1GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio P70 प्रोसेसर
 - 6.3 इंचाचा FHD+ (2340X1080) LTPS IPS  (इन-सेल) LCD डिस्प्ले
- 2.5D कर्व्ड ग्लास
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन 
 

Web Title: Realme U1 India launch highlights: Realme U1 starts at Rs 11,999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.