बिलिंग धोरणच नाही; ॲप्सना दणका; गुगल प्ले स्टोअरवरून हटविले जाणार १० भारतीय ॲप्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:14 AM2024-03-02T08:14:51+5:302024-03-02T08:14:59+5:30

गुगलच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली.

Not the billing policy itself; bump apps; 10 Indian apps to be removed from Google Play Store | बिलिंग धोरणच नाही; ॲप्सना दणका; गुगल प्ले स्टोअरवरून हटविले जाणार १० भारतीय ॲप्स 

बिलिंग धोरणच नाही; ॲप्सना दणका; गुगल प्ले स्टोअरवरून हटविले जाणार १० भारतीय ॲप्स 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : गुगलने आपल्या ॲप बिलिंग धोरणाची अंमलबजावणी न करणारे १० भारतीय ॲप्स आपल्या प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुगलच्या वतीने शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, ॲप विकासकांना गुगलच्या बिलिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. या काळात विकासकांनी अंमलबजावणीसाठी आवश्यक व्यवस्था केली नाही. त्यानंतर विकासकांना वाढीव मुदतही देण्यात आली होती. तिचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता असे १० ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

कारवाईऐवजी संयम बाळगा; कंपन्यांचे आवाहन 
nन्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने काही कंपन्यांनी गुगलचे बिझनेस मॉडेल आणि इकोसिस्टिमचा स्वीकार केला. 
nकाही कंपन्यांनी अजूनही त्याचा स्वीकार केलेला नाही. गुगलने तडकाफडकी कारवाई करण्याऐवजी संयम बाळगावा, असे आवाहन ३० पेक्षा अधिक कंपन्यांनी केले आहे.

कोर्टाकडून दिलासा नाही 
nप्राप्त माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅट्रिमोनी डॉट कॉमसारख्या काही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
nआपले ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्याची कारवाई थांबविण्याचे आदेश गुगलला देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात
आली होती. 
nसर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व याचिकेची सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली. 

Web Title: Not the billing policy itself; bump apps; 10 Indian apps to be removed from Google Play Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल