नोकिया ५ आजपासून स्टोअर्समध्ये मिळणार

By शेखर पाटील | Published: August 15, 2017 11:49 AM2017-08-15T11:49:10+5:302017-08-15T19:29:25+5:30

नोकिया कंपनीने आपल्या नोकिया ५ या मॉडेलला ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून विविध स्टोअर्समधून हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

Nokia 5 is available offline | नोकिया ५ आजपासून स्टोअर्समध्ये मिळणार

नोकिया ५ आजपासून स्टोअर्समध्ये मिळणार

Next
ठळक मुद्देनोकिया कंपनीने आपल्या नोकिया ५ या मॉडेलला ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहेनोकिया ब्रँडचे स्मार्टफोन विकण्याचे अधिकार असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३, नोकिया ५ व नोकिया ६ हे तीन स्मार्टफोन सादर केले होतेस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यातील नोकिया ५ हे मॉडेल खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे

नोकिया कंपनीने आपल्या नोकिया ५ या मॉडेलला ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून विविध स्टोअर्समधून हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन विकण्याचे अधिकार असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३, नोकिया ५ व नोकिया ६ हे तीन स्मार्टफोन सादर केले होते. जून महिन्यात हे तिन्ही मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आले होते. याची अगावू नोंदणीदेखील सुरू करण्यात आली होती. आता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यातील नोकिया ५ हे मॉडेल खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. देशातील निवडक शहरांमधल्या स्टोअर्समधून हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात सर्व शॉपीजमधून हे मॉडेल मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

नोकिया ५ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात १३ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. नोकिया ५ हे मॉडेल पहिल्यांदा मेट ब्लॅक या रंगात ग्राहकांना १२,४९९ रूपये मूल्यात खरेदी करता येईल. या स्मार्टफोनसोबत काही ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने व्होडाफोन कंपनीने १४९ रूपयात तीन महिन्यापर्यंत पाच जीबी डेटा मोफत देण्याची घोषणा केली आहे. तर मेक माय ट्रिपतर्फे २५०० रूपयांची सवलत देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे
* नोकिया ३, नोकिया ५ व नोकिया ६ हे मॉडेल्स जून महिन्यात लाँच करण्यात आले होते.
* या मॉडेल्सची विक्रीपूर्व नोंदणी सुरू आहे.
* यातील नोकिया ५ हे मॉडेल आता ऑफलाईन पध्दतीत स्टोअर्समधून खरेदी करता येईल.

Web Title: Nokia 5 is available offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.