CES 2019 : सॅमसंगचा नवा आविष्कार; 'रोबो' आपलं आरोग्य सांभाळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:09 PM2019-01-08T17:09:49+5:302019-01-09T07:35:57+5:30

CES 2019 : प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली तासा-तासाला तंत्रज्ञान विकसित होत आहेत. झटपट विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रत्येकाकडून पुरेपूर वापरदेखील केला जातोय. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यासंबंधित सेवा-सुविधांमध्ये उच्च स्तरावरील तंत्रज्ञानांचा जलदगतीनं विकास होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध टेक्नोलॉजीचा वापर प्रचंड वाढवल्याने मनुष्यप्राण्याचं आयुष्य कसं अगदी सुखावह झालंय, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.   

CES 2019 :Samsung shows off robots for health care and retail stores | CES 2019 : सॅमसंगचा नवा आविष्कार; 'रोबो' आपलं आरोग्य सांभाळणार!

CES 2019 : सॅमसंगचा नवा आविष्कार; 'रोबो' आपलं आरोग्य सांभाळणार!

प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली तासा-तासाला तंत्रज्ञान विकसित होत आहेत. झटपट विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रत्येकाकडून पुरेपूर वापरदेखील केला जातोय. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यासंबंधित सेवा-सुविधांमध्ये उच्च स्तरावरील तंत्रज्ञानांचा जलदगतीनं विकास होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध टेक्नोलॉजीचा वापर प्रचंड वाढवल्याने मनुष्यप्राण्याचं आयुष्य कसं अगदी सुखावह झालंय, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर मिनिटभरात हृदयाचे किती ठोके पडले?, किती प्रमाणात कॅलरीज बर्न झाल्या?, आपण किती पावले चाललो? याबाबतची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला सहसा आता वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही. कारण काही सेकंदांमध्येच अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती आपल्याला घरबसल्या मिळतेय.  

एवढ्या सर्व सुविधा आपल्या सेवेसाठी हजर असतानाही जर आपल्या आरोग्याची अगदी पूर्णतः काळजी घेणारे, आरोग्याचं टाईमटेबल जपणारं एखादं तंत्रज्ञान तुमच्या हाती लागले तर?. ही कल्पनाच किती सुखावणारी आहे ना. पण फिकर नॉट, आगामी काळात हे देखील शक्य होणार आहे. कारण, तुमचा-आमचा त्रास कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी'ने हायटेक रोबोट्सचा शोध लावला आहे. माणसांची शारीरिक कष्टाची कामे सुकर व्हावीत, त्यांच्यावर लक्ष ठेवता यावे आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत व्हावी, यासाठी विकसित करण्यात आलेल्या पर्सनल रोबोंच्या  फौजेचे अनावरण सॅमसंगने केले आहे. लास वेगासमध्ये सुरू असलेल्या 'CES Technology Conference' मध्ये रिटेल स्टोअर आणि हेल्थ केअर या क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरतील, असे दोन रोबोट्स सॅमसंगनं जगासमोर आणले आहेत. 

(ब्रेन स्ट्रोकच्या धोक्याबाबत सेन्सर करणार अलर्ट, रक्ताच्या दोन थेंबामधून कळणार माहिती)

हे नवेकोरे रोबोट्स घरामध्ये तसंच कामाच्या ठिकाणी आपल्यासोबत एखाद्या मदतनीसाप्रमाणे असतील, जे तुमचे ब्लड प्रेशर, शारीरिक तापमान, पल्स रेट तपासणे, शारीरिक कार्यप्रणाली, औषधांचे वेळापत्रक लक्षात ठेवणे, वैद्यकीय सल्ला देणे, झोपेचे निरीक्षण करणे, या सर्वांवर नजर ठेवले. इतकंच नाही तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यास 'बोट केअर' रोबोट अॅम्ब्युलन्सदेखील स्वतःहूनच बोलावेल. घरगुती वापराच्या दृष्टीने या रोबोटची रचना करण्यात आल्याची माहिती South Korean Technology Giant कंपनीनं दिली आहे. तर हवेची गुणवत्ता मापण्यामध्ये बोट एअर रोबोटची मदत होणार आहे. 

पण, हे रोबोट्स बाजारात कधी आणले जाणार आहेत आणि त्यांची किंमत किती रुपये असणार आहे, याबाबतची माहिती सॅमसंगकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

तर दुसरीकडे, होम रोबोट प्रकल्पावर प्रतिस्पर्धी Amazon.com कंपनीदेखील काम करत आहे.  तर अॅपल वॉचच्या माध्यमातून अॅपल कंपनीनं ग्राहकांसाठी आरोग्यासंबंधित सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

दरम्यान, आरोग्याची काळजी घेणारे टाईमटेबल कसं पाळायचं?, याबाबतची अनेकांची समस्या या हायटेक रोबोट्समुळे लवकरच सुटणार आहे. एकूणच काय तर मानवाचं आरोग्य निरोगी राहावं, या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या कंपन्या 'मागणी तसा पुरवठा' या धोरणानुसार वेगानं भन्नाट अशी तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

Web Title: CES 2019 :Samsung shows off robots for health care and retail stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.