सावधान ! तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकते

By अनिल भापकर | Published: March 16, 2019 01:27 PM2019-03-16T13:27:29+5:302019-03-16T16:30:40+5:30

जर तुम्ही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरले तर तुम्हाला ऑफिशिअल व्हॉट्सअॅपच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे व्हॉट्सअॅप कदाचित बंद होऊ शकते.

Be careful! Your WhatsAppApps may be turned off | सावधान ! तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकते

सावधान ! तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकते

Next
ठळक मुद्देजर तुम्ही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरले तर तुम्हाला ऑफिशिअल व्हॉट्सअॅपच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे व्हॉट्सअॅप कदाचित बंद होऊ शकते. जेव्हा तुम्ही हे थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करता तेव्हा त्यासोबतच तुमच्या मोबाइल वर एक हिडन प्रोग्राम इन्स्टाल होतो जो तुमचा सर्व डेटा, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करतो सध्या अनेक थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप उपलब्ध आहेत जसे कि जी बी व्हॉट्सअॅप, व्हॉट्सअॅप प्लस, यो व्हॉट्सअॅप,बी एस ई व्हॉट्सअॅप,एफ एम व्हॉट्सअॅप,वाय सी व्हॉट्सअॅप,ओ जी व्हॉट्सअॅप, व्हॉट्सअॅप एम ए , व्हॉट्सअॅप इंडिगो , झेड ई व्हॉट्सअॅप आदी.

अनिल भापकर

जेव्हा एखाद्या कंपनीचे उत्पादन बाजारात फार मोठ्या प्रमाणात विकल्या जाते किंवा लोकप्रिय होते तेव्हा काही लोक त्या उत्पादनाचे डुप्लिकेट थोड्या फार फरकाने लगेच बाजारात आणून लोकांची फसवणूक करून डुप्लिकेट उत्पादन विकण्याचा प्रयत्न करतात . असाच काहीसा अनुभव सध्या फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला येत आहे. कारण मागील काही वर्षांमध्ये व्हॉट्सअॅप युझर्स ला अनेक वेळा मेसेज येतात कि तुमचे व्हॉट्सअॅप अपग्रेड करून अमुक व्हॉट्सअॅप इंस्टाल करून घ्या.तुमच्या ऑफिशिअल व्हॉट्सअॅप पेक्षा यामध्ये अमुक सुविधा अधिक देण्यात आलेल्या आहेत. हे पूर्वी फ़क़्त सेलिब्रिटीसाठी उपलब्ध करण्यात आलेले होते मात्र आता ते  तुम्हाला  उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या नवीन थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप मध्ये तुम्हाला फ्री व्हिडिओ कॉलिंग ,फ्री ऑडिओ कॉलिंग ,एकाच वेळी अनेक  इमेजेस अटच करण्याची सुविधा अशा अनेक भूलथापा दिल्या जातात आणि युझर्स या भुलथापाला बळी पडतात आणि दिलेल्या लिंक वरून नवीन थर्ड पार्टी व्हॉट्सअॅपच्या लिंक वर क्लिक करता

आणि हे नवीन थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करता . मात्र आता जर तुम्ही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरले तर तुम्हाला ऑफिशिअल व्हॉट्सअॅपच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे  व्हॉट्सअॅप कदाचित बंद होऊ शकते.  

थर्ड पार्टी व्हॉट्सअॅपचा धोका

जेव्हा तुम्ही हे थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करता तेव्हा त्यासोबतच  तुमच्या मोबाइल वर एक हिडन प्रोग्राम इन्स्टाल होतो जो तुमचा सर्व डेटा, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करतो आणि इमाने इतबारे आपल्या मालकाकडे म्हणजेच थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप

बनविणाऱ्याकडे पाठवीत असतो . त्यामुळे तुमची प्रायव्हसी तर धोक्यात येतेच पण आजकाल अनेक युझर्स त्यांचे बँकिंग चे व्यवहार स्मार्टफोनद्वारेच करत असल्यामुळे त्यांचा बँकिंग चा डेटा चोरी होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची सुद्धा शक्यता असते.

थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप कोणते

सध्या अनेक थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप उपलब्ध आहेत जसे कि जी बी व्हॉट्सअॅप, व्हॉट्सअॅप प्लस, यो  व्हॉट्सअॅप,बी एस ई व्हॉट्सअॅप,एफ एम  व्हॉट्सअॅप,वाय सी  व्हॉट्सअॅप,ओ जी  व्हॉट्सअॅप, व्हॉट्सअॅप एम ए , व्हॉट्सअॅप इंडिगो , झेड ई  व्हॉट्सअॅप आदी.

तेव्हा काळजी घ्या आणि फक्त ऑफिशिअल व्हॉट्सअॅपच फक्त वापरा आणि तुमची प्रायव्हसी तसेच तुमच्या स्मार्टफोन मधील डेटा चोरी तसेच त्यामुळे होऊ शकणारे आर्थिक तसेच मानसिक नुकसान टाळा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप वापरले तर ऑफिशिअल  व्हॉट्सअॅप  तुमची  सेवा बंद करू शकते .यापूर्वीही एकदा व्हॉट्सअॅप प्लस नावाने युझर्सची  फसवणूक झालेली होती . तेव्हा व्हॉट्सअॅपनेच  सर्च करून व्हॉट्सअॅप प्लस असलेल्या मोबाइल  ची सेवा २४ तासासाठी खंडीत केली होती.तेव्हा आपण काळजी  घेतलेली बरी .

anil.bhapkar@lokmat.com

Web Title: Be careful! Your WhatsAppApps may be turned off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.