जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही लाँच केली VoLTE सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 09:38 PM2017-09-11T21:38:53+5:302017-09-11T21:39:14+5:30

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलनं आज व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच केली आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे.

Airtel launches VoLTE service to give competition to Jeo | जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही लाँच केली VoLTE सेवा

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही लाँच केली VoLTE सेवा

Next

मुंबई, दि.11 - देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलनं आज व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच केली आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे. मुंबईतून या सेवेला सुरुवात करण्यात आली. VoLTE सेवा देणारी एअरटेल भारतातील दुसरी दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलचे 26 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत.

VoLTE सेवा सध्या केवळ मुंबईतील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही सेवा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही, असं एअरटेलने म्हटलं आहे.

जिओची VoLTE सेवा केवळ 4G नेटवर्कवरच उपलब्ध आहे. मात्र एअरटेलचे 2G आणि 3G ग्राहकही डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची अडचण येणार नाही. ही टेक्निक केवळ एअरटेलकडेच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काय आहे VoLTE सेवा?
VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते. 

Web Title: Airtel launches VoLTE service to give competition to Jeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल