गावागावातील शांतता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल करणार; अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

By दिपक दुपारगुडे | Published: April 21, 2023 06:23 PM2023-04-21T18:23:01+5:302023-04-21T18:23:26+5:30

शांतता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

  Upper District Magistrate has ordered to file a case directly in case of breach of peace  | गावागावातील शांतता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल करणार; अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

गावागावातील शांतता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल करणार; अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

googlenewsNext

सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. समाजातील शांतता भंग केल्यास पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.


 

Web Title:   Upper District Magistrate has ordered to file a case directly in case of breach of peace 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.