उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 04:55 PM2018-11-30T16:55:02+5:302018-11-30T16:58:27+5:30

 पोलीस, ‘रस्ते विकास ’उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपघातच्या स्थळांची पाहणी

Take action ... to prevent accidents; Deputy Commissioner of Police Shashikant Mahavarkar | उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना

उपाययोजना करा़...अपघात रोखा; पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या सुचना

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढलेली वाढलेली अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघात स्थळांची पाहणी अधिकाºयांनी या स्थळांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढलेली आहे़ ही वाढलेली अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघात स्थळांची पाहणी करून तातडीने त्यावर उपाययोजना कराव्यात़ दरम्यान, जुना पुणे नाका, मडकी वस्ती, वारद फर्म या शहरालगतच्या क्षेत्रात रस्ते महामंडळाच्या वतीने अनेक कामे प्रलंबित आहेत ही कामे तातडीने महिनाभरात पूर्ण करून उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांनी दिल्या.

पुणे रोड मडकी वस्ती-वारद फार्म येथे वारंवार होणाºया अपघातावर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त, रस्ते प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व बसपा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह अन्य अधिकाºयांसमवेत पोलीस आयुक्तालयात बैठक झाली होती़ या बैठकीत अपघात स्थळाची पाहणी करण्याचे नियोजन ठरले होते, त्यानुसार गुरूवारी ४ वाजता संबंधित अधिकाºयांनी या स्थळांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या व त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी रस्ते विकास महामंडळाचे संजय कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, सहा़ पोलीस आयुक्त डॉ़ दीपाली काळे, वैशाली शिंदे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, संजय जगताप, सहा़ पोलीस निरीक्षक ढाकणे, पोलीस निरीक्षक देशमाने, पोलीस कॉन्स्टेबल मस्के, प्रवीण भोसले, मनपाचे अधिकारी कांबळे, बेदरकार, गेजगे आदी उपस्थित होते.

नॅशनल हायवेच्या चुकीच्या धोरणामुळे मडकी वस्ती वारद फार्म येथे दोन महिन्यांमध्ये चौथा बळी गेला़ परवाच्या घटनेत शरणव्वा संगप्पा हुक्केरी ही महिला रस्ता पार करताना अपघात होऊन मरण पावली़ यावेळी बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़ त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी गुरूवारी अपघातस्थळाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या़ यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे आदी उपस्थित होते.

गतिरोधक करा...सर्व्हिस रस्ता खुला करा
या अपघातस्थळाची पाहणी करताना संबंधित अधिकाºयांना सर्व्हिस रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे या रस्त्यावरून वाहने ये-जा करीत नसल्याचे पाहावयास मिळाले़ त्यामुळे पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना पुणे रोड मडकी वस्ती-वारद फार्म या परिसरात गतिरोधक करा, सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करा आदी सूचना दिल्या़ 

Web Title: Take action ... to prevent accidents; Deputy Commissioner of Police Shashikant Mahavarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.