Suspended priest in Pandharpur temple suspended | पंढरपूर मंदिरात वाद घालणारे पुजारी निलंबित

पंढरपूर : दोन पुजा-यांच्या वादात रूक्मिणीमातेस एक तास उशिरा नैवेद्य मिळाल्याच्या वृत्तानंतर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याने दोन्ही कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.
श्री रूक्मिणी मातेच्या महानैवेद्यास शुक्रवारी कर्मचा-यांच्या वादात विलंब झाला होता. सकाळी १०़३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखविण्यात येतो़ श्री विठ्ठलास महानैवेद्य दाखवून तो रुक्मिणी मातेच्या गाभाºयात पोहोचल्यानंतर तेथे सुनील गुरव आणि गणेश ताटे यांच्यात वाद सुरू झाला़ गुरव यांनी ताटे यांना तू तुझे म्हणणे मंदिर समितीकडे का सादर केले?, असा विचारले. त्यांचे हे भांडण मंदिरातच एक तास चालले होते, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.