ऊस, दूध दरासाठी 'स्वाभिमानीचा' पंढरपूरात रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 01:27 PM2018-06-24T13:27:50+5:302018-06-24T13:28:09+5:30

उसाची थकीत एफआरपी व दुधाला अनुदान मिळण्यासाठी पंढरपूर - सोलापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली रविवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Sugar, 'Swabhimani' for milk tariffs | ऊस, दूध दरासाठी 'स्वाभिमानीचा' पंढरपूरात रास्तारोको

ऊस, दूध दरासाठी 'स्वाभिमानीचा' पंढरपूरात रास्तारोको

Next

पंढरपूर : उसाची थकीत एफआरपी व दुधाला अनुदान मिळण्यासाठी पंढरपूर - सोलापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली रविवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल दोन तास महामार्गावरील वाहने रोखल्यामुळे वाहनांच्या लांबंच लांब रांगा लागल्या होत्या.
ऊस  आणि दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता आरपारची लढाई सुरु आहे. 29 जूनला पुण्यात होणा-या कैफियत मोर्चात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. 
या आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यासमवेत विष्णुभाऊ बागल, समाधान फाटे, महमुद पटेल, तानाजी बागल, सचिन पाटील, नवनाथ माने, विजय रणदिवे, रणजित बागल, सोनुभाई पाटीदार, विश्रांती भुसनर, नवनाथ बागल आदी उपस्थित होते.

Web Title: Sugar, 'Swabhimani' for milk tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.