अक्कलकोटच्या विकासासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून ५.५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर, उपसभापती प्रकाश हिप्परगी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:30 PM2018-02-23T15:30:02+5:302018-02-23T15:34:37+5:30

अक्कलकोट तालुक्यातील दलित वस्ती, तांडा वस्ती, धनगरवाडी-वस्ती सुधारणा, शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी जि.प.कडून ५ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती उपभापती प्रकाश हिप्परगी यांनी दिली़ 

Solapur Zilla Parishad approves fund of Rs 5.57 crore for development of Akkalkot, information about deputy professor Prakash Himpargi | अक्कलकोटच्या विकासासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून ५.५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर, उपसभापती प्रकाश हिप्परगी यांची माहिती

अक्कलकोटच्या विकासासाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडून ५.५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर, उपसभापती प्रकाश हिप्परगी यांची माहिती

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती सुधारणासाठी ३ कोटी ७० लाख, तांडा वस्तीसाठी ५३ लाख, धनगरवाडीसाठी ६८ लाख, शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख २ हजार ६९, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी ३६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी आ. सिद्धाराम म्हेत्रे, जि. प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सभापती सुरेखा काटगाव, गटविकास अधिकारी शिनारे, सहायक गटविकास अधिकारी महादेव बेळळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचे उपसभापती हिप


आॅनलाइन लोकमत सोलापूर
अक्कलकोट दि २३ : अक्कलकोट तालुक्यातील दलित वस्ती, तांडा वस्ती, धनगरवाडी-वस्ती सुधारणा, शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी जि.प.कडून ५ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती उपभापती प्रकाश हिप्परगी यांनी दिली़ 
हा निधी आ. सिद्धाराम म्हेत्रे, जि. प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सभापती सुरेखा काटगाव, गटविकास अधिकारी शिनारे, सहायक गटविकास अधिकारी महादेव बेळळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचे उपसभापती हिप्परगी यांनी सांगितले.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती सुधारणासाठी ३ कोटी ७० लाख, तांडा वस्तीसाठी ५३ लाख, धनगरवाडीसाठी ६८ लाख, शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख २ हजार ६९, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी ३६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. 
तांडा वस्तीची नावे : नागनळळी सहा लाख, बबलाद पाच लाख, शावळ तीन लाख, सिन्नूर १० लाख, चपळगाव पाच लाख, चुंगी सहा लाख, तडवळ सहा लाख, भासगी सहा लाख, सांगवी (बु) ६.५० लाख, धनगरवाडी रस्ता मंजुरी, बोरगाव तीन लाख, शावळ तीन लाख, सांगवी (खु.) तीन लाख, कल्लप्पावाडी सहा लाख, काझीकणबस तीन लाख, बिंजगेर पाच लाख, बादोले (बु.) पाच लाख, सापळा तीन लाख, तळेवाड पाच लाख, किणी पाच लाख, गळोरगी तीन लाख, वागदरी तीन लाख, करजगी तीन लाख, नाविंदगी तीन लाख, चिंचोली (न.) १० लाख, गौडगाव (बु) पाच लाख, दलित वस्ती कुरनूर तीन लाख, बादोले (बु.) ८.५ लाख, बादोले (खु.) तीन लाख, गौडगाव (बु.) पाच लाख, सलगर सहा लाख, चुंगी ८.५ लाख, तोळणूर १० लाख, डोंबरजवळगे तीन लाख, हन्नूर आठ लाख, बासलेगाव चार लाख, दहिटणे चार लाख, नागणसूर चार लाख, शिरवळ १५.५ लाख, अरळी ६.५ लाख, गळोरगी एक लाख, कोन्हाळी ७५ हजार, कर्जाळ ११ लाख, बिंजगेर पाच लाख, चिक्कळी सहा लाख, बोरेगाव ४.५० लाख, सांगवी (बु) पाच लाख, बबलाद ७.५ लाख, दोड्याळ तीन लाख, बोरगाव (दे.) ६.५ लाख, बोरगाव ४.५ लाख, संगोगी (ब.) पाच लाख, चपळगाव ८.५ लाख, हैद्रा ६.५ लाख, चिंचोळी (मैं) ३.५ लाख, बोरोटी (खु.) सात लाख, बोरोटी (बु.) ३.५ लाख, हंजगी ३.५ लाख, बणजगोळ ४.५ लाख, मिरजगी ३.५ लाख, सांगवी (खु.) ७५ हजार, वागदरी ३.५ लाख, जेऊरवाडी सहा लाख, आंदेवाडी (ज.) ३.५ लाख, निमगाव सहा लाख, तोरणी एक लाख, कल्लप्पावाडी ३.५० लाख, किणी ४.५ लाख, हत्तीकणबस २.५ लाख, कडबगाव ६.५ लाख, इब्राहिमपूर नऊ लाख, नागोर ३.५० लाख, शेगाव आठ लाख, कलहिप्परगी दोन लाख, कल्लकर्जाळ १३.५ लाख, कोर्सेगाव ६.५० लाख, करजगी ११ लाख, जेऊर ३६ लाख, खानापूर ९.५ लाख, हंद्राळ ३.५ लाख, चिंचोळी (न.) तीन लाख, मंगरुळ ९.५ लाख, आळगी १.५ लाख, गुड्डेवाडी चार लाख, कुडल तीन लाख, धारसंग ३.५० लाख, देवीकवठा ३.५० लाख. 
जेऊर शाळा दुरुस्तीसाठी २.५० लाख, मंगरुळ (म.) दोन खोल्या दुरुस्तीसाठी २ लाख ७६ हजार १६३, सुलेरजवळगे दोन खोल्या २ लाख २८ हजार ५५१, कुमठे २ खोल्या २ लाख ३३ हजार ९७, म्हैसलगी तीन खोल्या २ लाख ५७ हजार ७२४, आंदेवाडी (बु) दोन खोल्या १ लाख ७२ हजार ६०२, हिळ्ळी तीन खोल्या २ लाख ९२ हजार १४३, गुड्डेवाडी तीन खोल्या २ लाख ७२ हजार ६५४, केगाव दोन खोल्या २ लाख ५१ हजार ७९९, भुरीकवठे तीन खोल्या दोन लाख ४१ हजार १६४, कोर्सेगाव तीन खोल्या २ लाख ५१ लाख २०१ रुपये.

Web Title: Solapur Zilla Parishad approves fund of Rs 5.57 crore for development of Akkalkot, information about deputy professor Prakash Himpargi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.