सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:29 PM2019-05-18T12:29:47+5:302019-05-18T12:31:06+5:30

महावितरणचा उपक्रम ; ३११ शेतकºयांनी भरले पैसे; ४४९६ अर्ज प्राप्त

Solapur use has increased in Solapur district | सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत

सोलापूर : मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातून ४४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३११ शेतकºयांनी कोटेशन भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सोलरवर शेतीपंप सुरू होणार आहेत.

शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अशातच मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या शेतकºयांना कनेक्शन देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतून ठेकेदाराला काम दिले आहे. मार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. याची निविदा कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात आले.

मात्र ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अधिक पोलची आवश्यकता आहे किंवा शेतीपंपाला वीज देण्यासाठी जवळपास लाईन नाही, अशा ठिकाणी व गरजेनुसार सोलर यंत्रणा बसविण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्र चुकीचे असणे, गटनंबर चुकीचा टाकणे, १०० मीटरपेक्षा अधिक खोलीचा बोअर असणे, अतिशोषित (पाणी उपसा बंद असलेला भाग) सामाईक क्षेत्र असलेल्यांनी संमतीपत्र दिले नाही, असे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पात्र असलेल्यांपैकी ५४५ शेतकºयांना कोटेशनपत्र दिले होते. 

पत्र दिलेल्यांमधील ३११ शेतकºयांनी प्रत्यक्षात पैसे भरले असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकºयांनाही शेतकरी हिस्सा भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, जे शेतकरी पैसे भरतील त्यांना सोलर कृषी पंप बसवून दिला जाईल. तीन एचपीसाठी साधारण १८ हजार व ५ एचपीसाठी साधारण २६ हजार रुपये शेतकºयांनी भरावयाचे असून, सोलरसाठीचा संपूर्ण खर्च वीज महामंडळ करणार आहे.


३९ सोलरपंप बसविले
- मागील वर्षीपासून जिल्ह्यात सौरवर चालणारे शेतीपंप बसविण्याचे काम सुरू आहे. अटल सोलर कृषी पंप योजनेतून मागील वर्षभरात ३९ शेतीपंप बसविले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. नव्याने अर्ज करणाºयांना व ज्या ठिकाणी शेतीपंपाला वीज देण्यासाठी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जात असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अडचणीचे आहे, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जाणार आहे. तीन व पाच हॉर्सपॉवरचे पंप बसविले जाणार आहेत. यासाठी शेतकरी हिस्सा भरलेल्यांना कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. पात्र असलेल्यांकडून पैसे भरून घेऊन कनेक्शन दिले जाणार आहेत.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Solapur use has increased in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.