सोलापूर महानगरपालिका स्थायी सभापतीसाठी रस्सीखेच, इच्छुकांचे लॉबिंग, दोन मंत्र्यांमध्ये कशी होणार वाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:56 PM2018-02-06T14:56:36+5:302018-02-06T14:57:58+5:30

मनपा स्थायी सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार  देशमुख यांच्या गटातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.

Solapur municipal elections will be held for the post of chairman, lobbying of aspirants and two ministers. | सोलापूर महानगरपालिका स्थायी सभापतीसाठी रस्सीखेच, इच्छुकांचे लॉबिंग, दोन मंत्र्यांमध्ये कशी होणार वाटणी 

सोलापूर महानगरपालिका स्थायी सभापतीसाठी रस्सीखेच, इच्छुकांचे लॉबिंग, दोन मंत्र्यांमध्ये कशी होणार वाटणी 

Next
ठळक मुद्देपहिल्या वेळेस पालकमंत्री गटाच्या संजय कोळी यांची वर्णी लागल्याने यावेळेस सहकारमंत्र्यांच्या गटाच्या सदस्याला संधी मिळावी या मागणीला जोर धरला आहेभाजपमध्ये सत्तांतर झाल्यावर पदाधिकारी निवडीवेळी रस्सीखेच झाली होतीसहकारमंत्र्यांनी या निवडीत लक्ष घातले तर पदांच्या वाटणीवरून पुन्हा चुरस निर्माण होणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : मनपा स्थायी सभापतीपदी वर्णी लागण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार  देशमुख यांच्या गटातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. पहिल्या वेळेस पालकमंत्री गटाच्या संजय कोळी यांची वर्णी लागल्याने यावेळेस सहकारमंत्र्यांच्या गटाच्या सदस्याला संधी मिळावी या मागणीला जोर धरला आहे. 
भाजपमध्ये सत्तांतर झाल्यावर पदाधिकारी निवडीवेळी रस्सीखेच झाली होती. पालकमंत्री गटाचे ३५ तर सहकारमंत्री गटाचे १६ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी  स्थायी व सभागृहनेतेपद आपल्याच गटातील सदस्यांना दिले. या वादातून वर्षभर पदाधिकाºयांना कामच करता आले नाही. आता स्थायी सभापती संजय कोळी यांची मार्चमध्ये मुदत संपत आहे. तर स्थायी सभेतून भाजपचे चार सदस्य निवृत्त झाले आहेत. फेब्रुवारी सभेत  या चार सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची वर्णी लागणार आहे. आपल्या गटाचे जितके सदस्य बाहेर गेले तितकेच पुन्हा नव्याने आत येतील असे पालकमंत्री देशमुख यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद उफाळला तर मतदानाद्वारे जरी निवड झाली तरी आपल्याच गटाला पद मिळावे अशी सावध भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे नवी चार नावे कोणाची असतील यावरूनही सभापती पदाची दिशा ठरणार आहे. इकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला यावेळेला तरी स्थायी सभापतीपदाची संधी मिळावी असे वाटत आहे. त्यादृष्टीने सदस्यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. नागेश वल्याळ यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांनी सभागृहनेता पदावर पसंती दाखविली आहे. त्यामुळे त्यांना सभागृहनेता सुरेश पाटील यांच्या निवृत्तीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नव्याने येणाºयांमध्ये संगीता जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी या निवडीत लक्ष घातले तर पदांच्या वाटणीवरून पुन्हा चुरस निर्माण होणार आहे. इकडे श्रीनिवास रिकमल्ले, शिवानंद पाटील यांनीही फिल्डिंग लावली आहे.

Web Title: Solapur municipal elections will be held for the post of chairman, lobbying of aspirants and two ministers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.