बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:38 AM2018-02-22T09:38:51+5:302018-02-22T09:39:57+5:30

१ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Rs 12.24 crores will be provided for connection of agricultural connections in Barshi taluka, information of Rajendra Mirgane, energy ministry orders | बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

बार्शी तालुक्यातील कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १२.२४ कोटींचा निधी मिळणार, राजेंद्र मिरगणे यांची माहिती, ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश

Next
ठळक मुद्देनिधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिलेनवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरजराज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
बार्शी दि २२ : तालुक्यातील १ हजार ६९१ कृषीपंपाच्या नवीन विद्युत जोडणीसाठी लागणाºया नवीन रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आपण स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले.  
निधी देण्याचा आदेश राज्य महावितरणचे संचालक साबू यांना ऊर्जामंत्र्यांनी दिले असून राजेंद्र मिरगणे यांनी राज्य शासनाने दोन वर्षांत जलयुक्तची कामे राबविल्यामुळे पाणी अडवून बार्शी तालुक्यातील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले. 
त्यासाठी नवीन वीज जोडणीची मागणी वाढली; पण महावितरणकडे पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने १ हजार ६९१ शेतकºयांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. शिवाय अनेक रोहित्रावर जादा लोड होऊन अनेकवेळा नादुरुस्त होतात. त्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होतो, म्हणून नवीन १ हजार ६९१ जोडणी करण्यासाठी २०४ रोहित्रासाठी १२ कोटी २४ लाखांच्या निधीची गरज असल्याची मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत ऊर्जामंत्री यांच्याकडे राजेंद्र मिरगणे यांनी केली होती. त्यामुळे निधी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अरुण कापसे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील उपस्थित होते.
-------------------------
हाही प्रश्न मिटला
- बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील शेतकºयाच्या जमिनी भूम तालुक्यात आहेत. त्यांच्या कृषीपंपास भांडगाव (ता. भूम) या फिडरवरून वीज जोडणी आहे. पण त्यावर जादा लोड झाल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे या शेतकºयांच्या कृषी पंपास बार्शी तालुक्यातील बोरगाव फिडरवरूनच  वीजपुरवठा करण्याच्या मागणीसही हिरवा कंदील ऊर्जामंत्र्यांनी दाखविल्याचे मिरगणे यांनी सांगितले. 

Web Title: Rs 12.24 crores will be provided for connection of agricultural connections in Barshi taluka, information of Rajendra Mirgane, energy ministry orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.