एप्रिलपासून राज्यातील शिक्षकांचे पगार होणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 03:03 PM2019-01-28T15:03:23+5:302019-01-28T15:07:42+5:30

सोलापूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ...

Online teachers will get salary salary from April | एप्रिलपासून राज्यातील शिक्षकांचे पगार होणार आॅनलाईन

एप्रिलपासून राज्यातील शिक्षकांचे पगार होणार आॅनलाईन

Next
ठळक मुद्देशालार्थ प्रणालीचे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) या कंपनीकडेदोन महिने सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम होईल. जुन्या सॉफ्टवेअरमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंतची माहिती असल्यामुळे त्यानंतरची सर्व माहिती अद्ययावत करावी लागणार

सोलापूर : राज्यातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मार्च २०१९ पर्यंत आॅफलाईन करण्यात येणार आहेत; मात्र एप्रिल महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे पगार आॅनलाईनच करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालार्थ प्रणालीचे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) या कंपनीकडे देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

शालार्थ प्रणालीच्या देखभालीचे कंत्राट टीसीएस या कंपनीकडे होते, परंतु गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात टीसीएस या कंपनीची मुदत संपल्यानंतर या सॉफ्टवेअरची देखभाल करण्याची जबाबदारी पुन्हा टीसीएसकडे द्यायची की एनआयसीकडे यावर एकमत न झाल्याने अखेर शालार्थ प्रणाली सुरू करेपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे पगार आॅफलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शालार्थ प्रणालीवरून तब्बल ५ लाख ७० हजार कर्मचाºयांचे पगार आॅनलाईन काढण्यात येत होते. परंतु गेले वर्षभर ही प्रणाली सुरूच झाली नसल्याचे दिसून येत आहे. 

शालार्थ प्रणालीची माहिती महाआयटीच्या सर्व्हरवर
- यासंदर्भात महाआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएसच्या सर्व्हरवर शालार्थ प्रणालीची जी माहिती आहे, ती ३१ जानेवारीपर्यंत महाआयटीच्या सर्व्हरवर घेण्याची प्रक्रिया पूर्ण  केली जाईल. त्यानंतर दोन महिने सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम होईल.

 यामध्ये जुन्या सॉफ्टवेअरमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंतची माहिती असल्यामुळे त्यानंतरची सर्व माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याचे काम शिक्षण विभागाकडून केले आहे. या सर्व शिक्षकांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी लागणार आहे. त्यानंतर मात्र शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांचे पगार आॅनलाईन होतील.

Web Title: Online teachers will get salary salary from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.