Niggaon (M) Talathi Attempt on taking bribe | लाच घेताना निमगांव (म) चा तलाठी अटकेत

ठळक मुद्देसातबारा उताºयावर नोंद लावण्यासाठी मागितले पैसेसोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलाचखोरावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोलापूर : सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना निमगांव (म) (ता़ माळशिरस) च्या तलाठ्यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़

दत्तकुमार कृष्णाजी लाळे (वय ४५) तलाठी, नेमणुक - निमगांव (म) माळशिरस, रा़ प्लॅट नं ३ मनोरमा कॉम्पलेक्स, अवंतीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच स्वीकारणाºया तलाठयाचे नाव आहे़ तक्रारदार यांच्या मौजे निमगांव म हद्दीतील शेतजमिनीवरील बँकेच्या बोझ्याची सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी तलाठी लाळे यांनी २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही मागणी केलेली लाच निमगाांव म हद्दीत वेळापूर रोडवर स्वीकारली असता सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने रंगेहाथ पकडले़

ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी केले़


Web Title: Niggaon (M) Talathi Attempt on taking bribe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.