शर्ट शिवण्याच्या बहाण्यानं घरात घुसूननराधमानं केला नववीतल्या मुलीवर अत्याचार

By विलास जळकोटकर | Published: August 27, 2023 06:14 PM2023-08-27T18:14:56+5:302023-08-27T18:15:05+5:30

आई गेली होती कामाला : कोणाला सांगितल्यास खल्लास करण्याची धमकी

man raped a ninth grade girl incident in solapur | शर्ट शिवण्याच्या बहाण्यानं घरात घुसूननराधमानं केला नववीतल्या मुलीवर अत्याचार

शर्ट शिवण्याच्या बहाण्यानं घरात घुसूननराधमानं केला नववीतल्या मुलीवर अत्याचार

googlenewsNext

सोलापूर: फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करुन आलेल्या एका नराधमानं घरात कोणी नसल्याचं पाहून घराचे दार बंद करुन नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी रविवारी जोडभावी पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे.

या प्रकरणी नराधमाला अटक केली आहे. यातील पिडित मुलीची आई शिलाईचे काम व मजुरी करुन दोघी आली गुजराण करतात. काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती इयत्ता नवनीमध्ये शिकते. शनिवारी तिची आई कामासाठी बाहेर गेली होती. पिडितेच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती फाटलेला शर्ट शिवायचा आहे म्हणून घरात आला. पिडितेने त्याला आई कामाला गेली आहे परत या असे सांगितले. याचवेळी त्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार आला. त्याने घराचे दार बंद करुन या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट आईला सांगितली तर तुला खल्लास करतो म्हणून धमकी दिली.

दुपारी दोनच्या सुमारास पिडितेचे आई घरी आली. तेव्हा तिने घाबरुन काही सांगितले नाही. रात्री १० वाजता झोपेतून उठून तिने रडत सारा प्रकार आईला सांगितला. रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या नातलगाशी चर्चा करुन पिडिता व तिच्या आईने जोडभावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तातडीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.

Web Title: man raped a ninth grade girl incident in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.