महाराष्ट्र बंद़़......सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठे काय जाणून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:33 AM2018-01-03T11:33:12+5:302018-01-03T11:36:52+5:30

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़

Maharashtra Bandh ...... Where to Know In Solapur City and District ...! | महाराष्ट्र बंद़़......सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठे काय जाणून घ्या...!

महाराष्ट्र बंद़़......सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठे काय जाणून घ्या...!

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़- शांतता राखा, सोशल मिडियावरअफवा पसरवू नका - पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांचे आवाहन - कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या़...पोलीसांना सहकार्य करा : पोलीस आयुक्त महादेव तांबडे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़
- सोलापूर शहर व जिल्ह्यातील सकाळच्या सत्रातील शाळा काही ठिकाणी चालू तर काही ठिकाणी बंद आहेत़
- सोलापूर-बार्शी रोडवर अकोलेकाटी फाट्याजवळ सोलापूर महानगरपालिकेची संतप्त जमावाने बस फोडली
- विद्यार्थी वाहतुक संघटनांनी वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वत: आज वाहतुक बंद ठेवली
- नवीपेठ, शिवाजी चौक, सात रस्ता, विजापूर वेस, टिळक चौक आदी बाजारपेठेतील दुकाने बंद़
- पोलीसांनी नवीपेठ, पाणीवेस, लक्ष्मी मार्केट आदी परिसरात रूट मार्च करून व्यापाºयांना दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले़
- पुना नाका, तुळजापूर नाका, हैद्राबाद नाका आदी नाक्यावर नाकाबंदी सुरू
- पोलीसांचा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
- सोलापूर एसटी बसस्थानकात शुकशुकाट, प्रवासी अडकून पडले
- सोलापूर महानगरपालिका परिवहनची बससेवा तुरळक प्रमाणात सुरू
- बाजार समितीत व्यवहार सुरळीत, पालेभाज्याचे लिलाव सुरू
- दत्त नगर येथे मोर्चासाठी जमणाºया माकपच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात
- सकाळच्या सत्रात पंढरपूर बसस्थानकावरील एसटी बससेवा बंद होती
- करमाळा, अक्कलकोट, बार्शी आदी तालुक्याचे ठिकाणी कडकडीत बंद
- शहरातील शाळा, महाविद्यालयासमोर पोलीसांचा मोठा बंदोबस्त
- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुकाने बंद करा म्हणाºया दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात
- निराळे वस्ती येथे पोलीसांची धरपकड सुरू, काही कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
- तरटी नाका, बाळीवेस येथे तणावपूर्ण शांतता
- कस्तुरबा मार्केट १०० टक्के बंद
- टेंभुर्णी येथे वैद्यकीय सेवा वगळता १०० टक्के बंद
-मोहोळ शहर कडकडीत बंद
-मंगळवेढा बसस्थानकात शुकशुकाट
- मोडनिंब शहरातील व्यवहार सुरळीत सुरू
- सम्राट चौकात गोंधळ घालणाºया ३० कार्यकर्त्यांना पोलीसांनी केली अटक
- सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़
- सोलापूर ग्रामीण भागात पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ कर्मचाºयांना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले
- शांतता राखण्याचे शहर व जिल्हा पोलीस प्रमुखांचे आवाहन
-

Web Title: Maharashtra Bandh ...... Where to Know In Solapur City and District ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.